नागपूर : गोवारी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तो विषय ऐरणीवर आला आहे. गोवारी समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे म्हणून शुक्रवारी गोवारी बांधवांनी नागपुरात मोर्चा काढला. गोवारी जमातीला आदिवासींसाठी असलेले आरक्षण देण्यात यावे यासाठी गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले समाज बांधव सहभागी झाले होते. त्यातील काही लोकांनी झिरो माइल चौकात रस्ता रोको केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. गोवारी समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याकरिता नेमण्यात आलेल्या के. एल. वडने समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघाला. पोलिसांनी मोर्चा गणेश टेकडी रस्त्यावर अडवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा