नागपूर : शहरातील नामांकित हाॅटेल प्राईडमधील ‘स्वीमिंग पूल’मध्ये पोहताना एका व्यापाऱ्याचा जुलै २०२३ मध्ये बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करावा या विनंतीसह हॉटेलचे महाव्यवस्थापक सुजितकुमार सिंह, मानव संसाधन व्यवस्थापक अमोल कोकाटे व अनुराग गुर्जर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुशांत धोपटे (५१) असे मृताचे नाव होते. ते हॉटेल प्राइड येथील स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होते. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोहायला गेले. सकाळी ९ वाजता स्वीमिंग क्लास संपल्यानंतर प्रशिक्षकाने निघण्याची इच्छा व्यक्त केली व तो कपडे बदलायला गेला. दरम्यान, पोहत असताना धोपटे यांना चक्कर आली व ते पाण्यात बुडाले. प्रशिक्षक कपडे बदलून परतल्यावर धोपटे दिसत नसल्यामुळे त्याने शगुनला विचारले. शगुनने हाताने इशारा करत ‘आम्ही इथेच पोहत होतो’, असे सांगितले. प्रशिक्षकाने टँकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीदरम्यान धोपटे यांनी स्विमिंगसाठी मेंबरशिप घेतल्याचे दिसून आले.

हेही वाचा :सोन्याच्या दरात मोठी घसरण, हे आहेत आजचे दर

तसेच अक्षय चतुरकर याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. तरीदेखील त्याला प्राईड हाॅटेलचे महाव्यवस्थापक सुजितकुमार सिंह, मानव संसाधन व्यवस्थापक अमोल सदाशिवराव कोकाटे व अनुराग राजेंद्र गुर्जर यांनी कामावर ठेवले. तसेच स्वीमिंग पूलजवळ जीव वाचविण्यासाठी आवश्यक उपकरणेही ठेवली नव्हती. त्यामुळे या चारही आरोपींच्या निष्काळजीपणामुळे धोपटे यांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. त्यानुसार, सोनेगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात १७ सप्टेंबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा :खळबळजनक! जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

तपास करा, आरोपपत्र नको

उच्च न्यायालयाने पोलिसांना आरोपींची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी सांगितले आहे. मात्र न्यायालयीन आदेश येत पर्यंत आरोपपत्र दाखल करण्याला स्थगिती दिली आहे. पोलिसांना उच्च न्यायालयात सहा आठवड्यात जबाब नोंदवायचा आहे. यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.