नागपूर : गेल्या काही वर्षांत विमानाने देशाअंतर्गंत प्रवास करणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी संख्या वाढताच उड्डाणांची संख्या वाढली आहे. सोबत या विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या सात महिन्यात नागपुरातून १३९ उड्डाणे रद्द करण्यात आली आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.

केंद्र सरकारने उडान योजना राबवून देशातील विविध शहर विमानसेवेने जोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरून दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, इंदूर, बेळगावी, लखनऊ, नाशिक, किशनगड, औरंगाबाद, नांदेड याशहरासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. यापूर्वी मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि आंतरराष्ट्रीय सेवा दोहा आणि शारजा अशी होती.

हे ही वाचा…धक्‍कादायक ! नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना

सर्वसामान्यांना विमानप्रवासाचा आनंद घेता यावा आणि हवाई नकाशावर अधिकाधिक छोटी शहरे यावीत यासाठी केंद्र सरकारने ‘उडान’ योजना सुरू केली. महाराष्ट्रातील नऊ विमानतळांचा विकास त्याअंतर्गत करण्यात आला आहे. त्यात नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गोंदिया या शहरांचा समावेश आहे.

१ जानेवारी २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत विमानतळावरून उडणारी तब्बल १३९ विमाने रद्द करण्यात आली. सात महिन्यात एवढ्या प्रमाणात विमान रद्द करण्यात आली. तर याच कालावधीत १६ विमाने नागपुरात उशिरा निघाले. खासगी विमान कंपन्या कमी प्रवासी असल्यावर विमान रद्द करतात. तसेच वैमानिक उपलब्ध नसल्याने देखील उड्डाण रद्द करण्याचे प्रकार घडले आहेत. याशिवाय अनेकदा तांत्रिक कारणामुळे देखील रद्द केले जातात. परंतु विमान कंपन्या केव्हाही विमान उड्डाण रद्द होण्यास तांत्रिक कारण सांगत असतात.

हे ही वाचा…धक्कादायक ! चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमाचा प्राणघातक हल्ला

नागपूरहून विमानाने जाणाऱ्यांची संख्या अधिक

१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात नागपुरात येणारे प्रवासी ७ लाख ६५ हजार १७३ होते. तर येथून जाणारे प्रवासी ७ लाख ९० हजार, ४४१ होते. २०२२-२३ या वर्षात ११ लाख ११ हजार चार प्रवास येथून बाहेरगावी गेले आणि ११ लाख ५४ हजार ८२ प्रवासी येथे आले. २०२३-२४ या वर्षात १४ लाख ३६ हजार ८७७ प्रवासी आले आणि येथून १४ लाख ५३ हजार ९९८ गेले.