नागपूर : राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, अशी ओरड विरोधी पक्षांकडून केली जाते, ती केवळ राजकीय द्वेषातून. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार गडचिरोलीमध्ये हजारो रुपयांची गुंतवणूक होणार आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : तमाशातील मृत कामगारांच्या नातेवाईकांचा आक्रोश; पार्थिव घेण्यास नकार, जिल्हा रुग्णालयात तणाव

सामंत गुरुवारी दुपारी नागपूरला आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची विरोधकांकडून ओरड केली जाते, ती केवळ राजकीय आहे. आम्ही गेल्या अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली होती, त्यात हे सिद्ध झाले आहे. वेदांता प्रकल्प आता गुजरातमध्ये होतो की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. देशातील जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा मुंबईमध्ये होतो आहे. ५० हजार लोकांना यातून रोजगार मिळेल. एखादा उद्योग विस्तारासाठी गुजरातमध्ये गेला तर संपूर्ण यंत्रणा तिकडे गेली, असे होत नाही. विरोधकांना केवळ राजकारण करायचे असून त्यांना राज्याच्या विकासाबाबत काही देणघेणे नाही, असे सामंत म्हणाले.

हेही वाचा : नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकार सकल मराठा समाजाला टिकणारे आणि न्यायालयात कुठेही बाधित होणार नाही, असे आरक्षण देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नसलेली शिवसेना (ठाकरे गट) यांना वाद घालण्यापलीकडे काही जमत नाही. वाद आणि ठाकरे गटाचे जवळचे नाते आहे, अशी टीकाही सामंत यांनी केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार जे संभाव्य पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे, ते महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव करतात. मात्र, त्यावर कुणी बोलत नाही. राहुल गांधी पंतप्रधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतात, त्यावर कोणी बोलत नाही, अशी टीका सामंत यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur industry minister uday samant said that not a single project went outside maharashtra vmb 67 css
Show comments