नागपूर : छिंदवाड्यातील निर्माणाधीन इमारतीवरून एक मजूर ८० फूट खाली उभ्या लोखंडी सळईवर पडला. ही सळई रुग्णाच्या डोक्यातून आरपार निघाली. उपस्थितांनी सिमेंटच्या पिल्लरमधील सळई कापत त्याला सळई डोक्यातून आरपार असलेल्या स्थितीत नागपुरातील कल्पवृक्ष रुग्णालयात हलवले. येथे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्याला जीवनदान मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील रुग्णालयात १८ वर्षीय मजूर रुग्णवाहिकेतून पोहचल्यावर त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. हा प्रकार बघून डॉक्टरही थक्क झाले होते. तातडीने येथील मेंदू शल्यचिकित्सक डॉ. पवित्रा पटनायक, डॉ. कृष्णा पराते, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. विश्वास दशपुत्र, डॉ. संजय आंबटकर, डॉ. विक्रम देसाई, डॉ. कोमललिखार, डॉ. संजय यांना सूचना दिली गेली. या सगळ्यांसह आवश्यक चमू रुग्णालयात दाखल झाली.

हेही वाचा : कंत्राटी भरतीचा धडाका; दहा दिवसांत ११ हजार जागांबाबत शासन निर्णय, नोव्हेंबपर्यंत एक लाख पदे भरण्याच्या हालचाली

दरम्यान, रुग्णाच्या डोक्यातून आरपार गेलेल्या सळईला कमीत कमी रुग्णाची कवटी आणि इतर रक्तवाहिन्यांना इजा होऊ न देता बाहेर काढण्याचे मोठे आवाहन होते. सळई कापण्यासाठी ‘फॅब्रीकेशन’ची मशीनही शस्त्रक्रियागृहात बोलावली गेली. या स्थितीत रुग्णाला हृदयविकारासह इतरही अनेक गुंतागुंत शक्य असते. त्यामुळे सगळ्याच शाखेच्या तज्ज्ञांना दक्ष राहण्याची सूचना केली गेली होती. शेवटी डॉ. पटनाईक आणि इतर सगळ्याच डॉक्टरांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया व प्रक्रिया केल्याने रुग्ण आता हळूहळू बरा होत आहे. त्याला बुधवारी अतिदक्षता विभागातून सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्याचे हात-पाय हलवण्यासह बोलणेही सुरू झाले आहे. सोबत त्याची दृष्टीही बरी दिसत असल्याचे डॉ. आर.जी. पाटील यांचे म्हणणे आहे.

या रुग्णाच्या उपचारात डॉ. संजय मदनकर, डॉ. स्मिता पराते. इंटेन्सिव्हिस्ट डॉ. राहुल हिवाज आणि चमूची भूमिकाही महत्त्वाची आहे. दरम्यान शुद्ध परतल्यावर रुग्णाने हात जोडून डॉक्टरांचे आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur iron rod pierced construction worker skull mnb 82 css