नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धमक्यांचे फोन आणि संदेश आले आहेत. त्याबाबत वडेट्टीवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धमकीचे संदेश आल्यानंतर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीर्घकाळापासून असलेल्या प्रश्नावर नवीन वाद निर्माण झाला आहे. त्याचा लाभ मराठा युवकांना होणार नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी (ओबीसी) जातीच्या प्रमाणपत्राच्या मागणीवर टीका केली होती. मराठ्यांना ‘कुणबी’ प्रमाणपत्र देणे हे ओबीसी प्रवर्गातील ३७२ पोटजातींवर अन्यायकारक आहे. पात्रता निश्चित करण्यासाठी मागास आयोगाकडून सखोल सर्वेक्षण करण्याची गरज आहे. मराठ्यांना ओबीसी दर्जा दिल्यास आपले हक्क धोक्यात येऊ शकतात, अशी भिती ओबीसी समाजात आहे.

हेही वाचा : पुण्‍यातून फरार गुन्‍हेगारांना अमरावतीत अटक

ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. पण, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यावर आक्षेप घेतला आहे. वडेट्टीवार यांना सकाळी भ्रमणध्वनीवर धमकी मिळाली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असून सुरक्षितेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यांना सध्या वाय प्लस सुरक्षा आहे.