नागपूर : बिबट्याचे पिल्लू खेळता खेळता आईपासून वेगळे झाले. थोड्या वेळाने आई दिसत नसल्याने ते कासाविस झाले. उसाच्या मळ्यात त्या पिलाने आश्रय घेतला. स्थानिकांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी लागलीच त्या पिल्लाला त्याची आई मिळवून देण्याचे ठरवले. वनखात्याने स्थानिक स्वयंसेवीच्या मदतीने योजना आखली आणि हरवलेल्या पिल्लाला त्याची आई मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटण तालुक्यातील मौजे नारळवाडी येथील बाग नावाच्या शिवारात रविवार दुपारी तीनच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊस तोडत असताना बिबट्याचे पिल्लू उसाच्या पाचटीत दिसून आले. अचानक बिबट्याचे पिल्लू दिसल्याने ऊसतोड कामगारांनी तेथून पळ काढला. यावेळी वन अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. वनविभागाने तत्काळ परिसरात येऊन पिल्लू ताब्यात घेतले.

हेही वाचा : अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “

तेथील परिस्थितीची माहिती घेऊन बिबट्या मादी त्याच परिसरात असल्याबत खात्री झाली व मादी बिबट्या आपले पिल्लू मागे राहील्यामुळे मादी चवताळू नये म्हणून पिल्लू व मादी यांचे पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी परिसरातील नागरिक यांना सावध करून परीसरात बंदोबस्त लावण्यात आले. कराड येथील वाईल्ड लाईफ रेस्कुअर्स टीम व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना पाचारण करण्यात आले. संध्याकाळी पुन्हा पिल्लू ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी पुनर्मिलनसाठी विशिष्ट प्रकारे क्रेट मध्ये ठेवण्यात आले. आजू बाजूला कॅमेरे लावण्यात आले. रात्री १२.१५ वाजता मादी बिबट्या पुन्हा आपल्या पिल्लूसाठी तेथे आली.

तिने क्रेटमधून आपले पिल्लू अलगद तोंडात धरून घेऊन गेली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटण राजेश नलवडे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल ठोंबरे, वनरक्षक यादव, विशाल हरपळ, रोहीत लोहार, वाईल्ड लाईफ रेस्कुअर्सचे रोहित कुलकर्णी, अजय महाडीक, रोहित पवार, गणेश काळे, रोहन वेळापूरे, नारळवाडीचे सरपंच अजित चव्हाण, पोलीस पाटील यांनी मोलाची मदत केली.

हेही वाचा : मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…

पिल्लू सुस्थितीत

मादी पिल्लू साधारण दोन महिन्याचे होते. वाईल्ड लाईफ रेस्कुअर्सचे रोहन भाटे, रोहित कुलकर्णी, अजय महाडीक, रोहित पवार, गणेश काळे, रोहन वेळापूरे, यांनी कराड पाटण तालुक्यात अनेक वन्यजीव रेस्कु ऑपरेशन व पुनर्मिलन वनविभागाच्या सहकार्याने घडवून आणले आहेत. त्यांनी मोलाची मदत केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur leopard found missing cub in patan taluka naralwadi village video goes viral rgc 76 css