नागपूर : सासूवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या जावयाला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पाच हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. पत्नीला दूर केल्याच्या रागातून जावयाने सासूवर चाकूने हल्ला केला होता. सत्र न्यायालयातील न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी सोमवारी शिक्षेचा निर्णय दिला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला पाच महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बुलढाणा : राज्य कुस्ती स्पर्धेत पुण्याचा रविराज चव्हाण धर्मवीर केसरी; सांगलीचा धनाजी कोळी उपविजेता

आरोपी धर्मेंद्र शाहू हा नारा येथील रहिवासी आहे. त्याचे आणि जखमी सासू अंतकला मेश्राम यांची मुलगी तृप्ती हिचे प्रेमसंबंध होते. त्यांनी २० जानेवारी २०१५ साली प्रेमविवाह केला. धर्मेंद्रने तृप्तीला सुरुवातीला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर मानसिक, शारीरिक छळ करण्याचा आरोप धर्मेंद्रवर लावण्यात आला. धर्मेंद्रने तिच्या शिक्षणाला देखील विरोध केला होता. यामुळे तृप्ती नोव्हेंबर २०१७ साली माहेरी निघून आली. काही महिन्यांनी धर्मेंद्र तृप्तीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आला. मात्र सासऱ्यांनी त्याची अडवणूक केली. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने धर्मेंद्र चिडला होता. यामुळे त्याने त्याच्या सासूवर चाकूने हल्ला करत तिला जखमी केले. विविध पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. शासनाच्यावतीने ॲड. पंकज तपासे यांनी युक्तिवाद केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur life imprisonment for son in law who attacked mother in law tpd 96 css