नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मतांमध्ये सलग तिसऱ्या निवडणुकीत (वर्ष २०२४) मोठी घट झाली आहे. यंदा बसपला केवळ १९ हजार २४२ मते मिळाली. त्यामुळे बसपच्या गटात चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरात बसप उमेदमवार किती मत घेणार, याकडे सगळ्याचेच लक्ष लागले होते.

उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षांपूर्वी बसपची सत्ता होती. त्यानंतर नागपूरसह महाराष्ट्रात हा पक्ष मजबूत होऊ लागला. परिणामी, बसपच्या मतदानाचा टक्काही वाढला. नागपूर महापालिकेतही बसपचे नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून आले. काही लोकसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवारांनी चांगली मतेही मिळवली. मात्र, गेल्या तीन निवडणुकीत हे चित्र बदलले. नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपच्या मतांमध्ये सतत घट होत आहे. २०२४ मध्येही बसपला केवळ १९ हजार २४२ मते मिळाली. नागपूर लोकसभेचा विचार केल्यास २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपच्या मतांमध्ये चांगली वाढ झाली. माणिकराव वैद्य यांनी बसपकडून १ लाख १८ हजार ७४१ मते मिळवली होती. मात्र, त्यानंतर मतांची संख्या घटत गेली. यंदाच्या निवडणुकीत मतांमध्ये मोठी घट झाल्याने बसपच्या गोटात चिंता वाढली आहे.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
vikas kumbhare
भाजप आमदाराचा थेट काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद… मध्य नागपूरात…
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
west Vidarbha, number of women candidates, contesting election
रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात

हेही वाचा : अमरावती: ‘त्‍यांनी’ चक्‍क स्‍मशानभूमीत सुरू केले उपोषण, एका उपोषणकर्त्‍याची प्रकृती….

नागपूर लोकसभा

वर्ष – उमेदवार – मते
२०२४ – योगिराज अलियास लांजेवार – १९,२४२

२०१९ – माेहंमद जमाल – ३१,७२५
२०१४ – मोहन गायकवाड – ९६,४३३
२००९ – माणिकराव वैद्य – १,१८,७४१
२००४ – जयंत दळवी – ५७,०२७

मायावतींच्या नागपुरातील सभेचाही लाभ नाही

नागपूर लोकसभा मतदार संघातून बसपाचे योगश लांजेवार यांना उमेदवारी दिली होती. तर नागपूरसह महाराष्ट्रातील बसपाच्या उमेदवारांसाठी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी नागपुरात सभाही घेतली. सभेला राज्यातील बसपाचे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह बहुतांश लोकसभेचे उमेदमवारही हजर होते. परंतु या सभेचा बसपाच्या नागपुरातील लांजेवार या उमेदवाराला लाभ झाला नाही. उलट बसपाच्या नागपुरातील उमेदवाराने मागील निवडणूकीहून कमी मत घेतल्याने बसपाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा : “महाविकास आघाडी कारस्थान करून शकुनी नितीने जिंकली”, पराभवानंतर बावनकुळेंची टीका

बसपा कार्यकर्ते प्रचारापासून दूर

नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेते- कार्यकर्त्यांकडून सतत मतदारसंघातील विविध भागात जास्तित जास्त नागरिकांपर्यंत मत मागण्यासाठी पोहचण्याचा प्रयत्न झाला. परंतु बसपाकडून मात्र शहरातील सर्व भागात पोहचण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. उलट मतदानाच्याही दिवशी शहरातील अनेक भागात बसपाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी निघाले नसल्याचीही सूत्रांची माहिती आहे. त्याचा परिणाम बसपाच्या मतांवर पडला.