नागपूर : ‘सेट तयार झाला का, अमूक कुठे आहे?’, अशा प्रश्नांची विचारणा, त्या अनुषंगाने सुरू असलेली लगबग, उत्साह आणि धाकधूकही, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षा पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी… अशा वातावरणात, तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारती विद्यापीठ, पुणे आणि शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचालित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नाविन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्ट्य ठरले.

हेही वाचा : लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…

Cases of distribution of money, Rajura Assembly Constituency, Kadholi village,
चंद्रपूर : पैसे वाटप करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पकडले, निवडणूक पथकाच्या…
attempt to bogus voting Allegations , Hingna Assembly Constituency,
धक्कादायक! महाविद्यालयातील मुलींकडून बोगस मतदान करून घेण्याचा प्रयत्न,…
Average voting in Akola district, Akola district voting,
अकोला जिल्ह्यात सरासरी ६५ टक्क्यांपर्यंत मतदान! मतदान केंद्राबाहेर रांगा; मतदार यंत्रात बिघाडी
Tapovan village, Karanja taluka, Washim district,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ‘या’ गावात मतदान, नागरिकांसाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण
Chandrapur city Voting, Chandrapur Voting,
चंद्रपूर : शहरात मतदारांमध्ये निरुत्साह तर ग्रामीणमध्ये उत्साह, सायंकाळी ५ पर्यंत ६४.४८ टक्के मतदान
Umarkhed, Sarpanch attacked in Umarkhed,
उमरखेडमध्ये सरपंचावर हल्ला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान
in wardha karade teacher popular on social media for varhadi language hit by bjp leaders
कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…
Buldhana district recorded over 43 64 percent polling till 3 pm across all seven constituencies
बुलढाण्यात मतदान उत्साहात; ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्क्यांपेक्षा जास्त…
BJP alleged Congress workers caught with money during polling in Naik Talao
नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा… काँग्रेसचे कार्यकर्ते…

फेरीच्या पहिल्या दिवशी दर्जदार एकांकिका मोठ्या उत्साहात सादर करण्यात आल्या. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ‘सुख विकणारा माणूस’ या नाटकाने शेतकरी कुटूंबातील महिलेवर होणारा अत्याचार, घरातील अठराविश्व दारिद्र, मुलीचे लग्न या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले तर दोन भावांमधील वाद, दुभंग व्यक्तिमत्त्व यासारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. यावेळी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या मित्रांच्या एकांकिका पाहायला आले होते. यावेळी तरुणाईच्या टाळ्या, हिप हिप हुर्रे… अशा जल्लोषात सभागृह दुमदुमले होते.