नागपूर: ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. नागपूरसह राज्यभरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश मूर्तींची स्थापना करून विविध कार्यक्रम घेतात. त्यासाठी मंडळांना अधिकृत वीज पुरवठा घेणे बंधनकारक आहे. यंदा अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास संबंधित मंडळांवर महावितरणकडून कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे लवकरच आगमण होणार आहे. हा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. या मंडळांना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज पुरवठ्याबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणी साठी घरगुती वीज पुरवठ्याच्या दरानेच वीजदर निश्चित केले आहे.
हेही वाचा : शिक्षकी पेशाला काळीमा, अमरावतीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
दरम्यान मंडळांनी अनधिकृत वीज जोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. मंडळांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीच्या मदतीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास संबंधित मंडळांवर महावितरणकडून वीज चोरीहून दुप्पट राशी वसूल करेल. सोबत तडजोड शुल्कही आकारले जाईल. ही राशी न भरणाऱ्याविरूद्ध वीजचोरी प्रकणात पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : “सरकार पुन्हा आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढविणार…”, मंत्री म्हणाले, “जोपर्यंत जिवंत आहे…”
मंडळासाठी महत्वाचे..
- गणेशोत्सवात अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीवर प्रवाहीत झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
- जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानीचा संभाव्य धोका आहे.
- वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असावी.
- तुटलेली किंवा लूज तार वापरू नये,