नागपूर: अयोध्येत सोमवारी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर राममय झाले आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत जसा उत्साह व गर्दी असते अगदी तशीच गर्दी बाजारात आहे. फक्त खरेदीच्या वस्तू वेगवेगळ्या आहेत. फक्त दिवाळीतच मोठ्या प्रमाणे विकले जाणारे फटाके आणि फुले जानेवारीत विकली जात आहेत. या वेळी रामाचे छायाचित्र असलेले झेंडे, भगवे झेंडे विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली असून विक्री जोरात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ जानवरीला अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशात वातावरण निर्मिती केली असून प्रचार, प्रसारामुळे आणि केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सुट्टीमुळे लोकांमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रचंड उत्सुकता आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत. दिवाळी खरेदीसाठी जशी बाजारपेठेत गर्दी होते तशीच गर्दी नागपुरात बाजारात आहे. विशेष म्हणजे फटाके, फुलांना दिवाळी सारखीच आताही मागणी आहे. त्यामुळे सोमवारी नागपूरकर दुसरी दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी करत आहेत, असे वाटते.

हेही वाचा : विदर्भात पावसाच्या सरी, हवामान खात्यानेही दिला इशारा

भाजपच्या प्रभावक्षेत्रातील दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, दक्षिण नागपुरातील काही भागात अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचंड उत्साह आहे, २२ तारखेला दिवाळी साजरी करण्यासाठी लोक खरेदीसाठी बाहेर पडत असून बाजारात रांगोळी, फटाके, झेंडे खरेदीसाठी गर्दी झाली आहे. सर्वात अधिक मागणी श्री राम लिखित झेंड्याची आहे. राममंदिर प्रतिकृती मोठ्या संख्येने विकल्या जात आहे. बाजारात वाढलेल्या गर्दीमुळे व्यापारी खूश आहे. दहा रूपयांचा झेंडा आता ५० रूपयाला विकला जात आहे . लोक काहीही न बोलता खरेदी करीत आहे. जशी दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. त्याच धर्तीवर २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जात असल्याचे चित्र नागपुरात आणि बाजारपेठेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur market diwali like crowd to buy rangoli flags and firecrackers cwb 76 css
Show comments