नागपूर : एमडी विक्री आणि खरेदीच्या पैशावरून दोन गटात हाणामारी झाल्यानंतर एकाने प्रतिस्पर्धी टोळीतील युवकावर गोळीबार केला. त्यात पोटात गोळी शिरली.तरीही युवकाने आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावली आणि थेट मेयो रुग्णालयात पोहचला. या प्रकरणी दोन्ही टोळ्यातील युवकांवर गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये गोळी झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांचादेखील समावेश आहे. मृणाल मयूर गजभिये (वय ३०, आनंदनगर) असे मुख्य आरोपीचे नाव असून जैनुलऊद्दीन सलीम कुरेशी (३१, रा. गड्डीगोदाम, सदर) असे जखमी गुन्हेगाराचे नाव आहे. एमडी तस्करीच्या पैशावरून मृणाल आणि कुरेशीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुरेशीने मृणालला खंडणीची रक्कम मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी सकाळी ७:३० वाजता कुरेशी हा साथीदार नितीन संतोष गुप्ता (वय २९, बुटी चाळ, गड्डीगोदाम चौक), राहुल ऊर्फ गोलू गोंडाणे (२२, इंदोरा चौक, पाचपावली) आणि समीर दुधनकर (हुडकेश्वर) यांच्यासह मृणालच्या घरी पोहोचला. त्याने मृणालला बोलण्यासाठी घराबाहेर बोलावले. तो आल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाला. कुरेशीने त्याच्याकडे पैसे मागितले. वाद वाढल्यावर मृणालने पिस्तुलातून गोळीबार केला. नितीनने पिस्तूल पकडण्याचा प्रयत्न केला व त्यात कुरेशीच्या पोटात गोळी झाडली गेली. यानंतर कुरेशीने पिस्तूल हिसकावत घटनास्थळावरून पळ काढला. तो थेट गंभीर जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात पोहचले.

हेही वाचा : ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे स्टेटस; वनकर्मचारी निलंबित

मृणालचे वडील मयूर लक्ष्मण गजभिये (वय ५१), अंशुल जगतनारायण सिंग (२६, गोवा कॉलनी, मंगळवारी) व राजा खान अब्दुल गफार (३१, गोवा कॉलनी, मंगळवारी बाजार) यांनी नितीनला मारहाण केली. साखर झोपेत असलेल्या सीताबर्डी पोलिसांना या घटनेची माहिती मिळू शकली नाही. मेयो रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना फोन करून गोळीबारात जखमी युवक रुग्णालयात आल्याची माहिती दिली. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांची तारांबळ उडाली. नितीन गुप्ता याच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात मृणाल, मयूर गजभिये, अंशुल व राजा खानविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली, तर मृणालच्या तक्रारीवरून कुरेशी, नितीन गुप्ता, राहुल गोंडाणे व समीर दुधानकरविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा : युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक

सीताबर्डीचे डीबी पथक सुस्त

शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात नवनियुक्त ठाणेदार आहे. पण ठाण्यातील डीबी पथकाला गोळीबार झाल्याची माहिती न मिळाल्याने कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला तर कानोकान खबर नव्हती. त्यामुळे अधिकारी मस्त आणि कर्मचारी सुस्त अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.