बुलढाणा : अल्पवयीन मतिमंद मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम युवकास खामगाव न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खामगाव न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. कुळकर्णी यांनी हा गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल दिला. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी आरोपी राम भारत पालकर ( २७) याने पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी डोकेदुखी! सर्व्हर डाऊन, आज शेवटची तारीख

या प्रकरणी ९ नोव्हेंबर २०१८ रोजी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी डी. बी. वाघमोडे यांनी तपास करून खामगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीशांनी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे व साक्षी तसेच युक्तिवाद लक्षात घेऊन निकाल दिला. यामध्ये पाच डॉक्टरांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.