नागपूर : मकर संक्रातीचा सण संपून महिना लोटला आहे. आकाशात पतंगांचा वावर कमी झाला असला तरी मांजा मात्र जागोजागी अडकला आहे. किंबहुना पक्षांसाठी हा मांजा मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. नागपूर शहरातील कामठी मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलावरील रेलिंग (सुरक्षा कठडे) मध्ये गुंडाळलेल्या मांज्यात एक पोपट अडकला होता. सेमिनारी हिल्सवरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या बचाव पथकाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांना त्या पोपटाला वाचवणे अशक्य वाटत होते.

हेही वाचा : नागपूर : कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Five Rarest Cat Breeds
मांजरीच्या दुर्मीळ पाच जाती कोणत्या तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या माहिती…

सुरुवातीला बचाव पथकाचे जवान जाऊन परत आले. पण नंतर त्यांनी मेट्रो व्यवस्थापनाकडे मदतीचा हात मागितला. हा पोपटाचा बचाव अशक्य असताना, चक्क मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली आणि त्या पोपटाचा जीव वाचवला. या पोपटाला वाचवण्यासाठी ट्रान्झिट केंद्राला दूरध्वनी आला. त्यानंतर केंद्राचे बचाव पथक त्याठिकाणी पोहोचले. पोपटाची काहीच हालचाल दिसली नाही. त्यामुळे त्याला मृत समजून ते परत आले. खूप उंचावर तो अडकला असल्याने त्याला काढण्यासाठी अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले, पण त्यांचीही शिडी त्या पोपटापर्यंत पोहचत नव्हती. बचाव पथकाचे हरीश किनकर, वनमजूर रवी मिटकरी, ट्रान्झिटचे बंडू मंगर, स्वप्निल भुरे हे पुन्हा त्याठिकाणी गेले. हरीश किनकर यांनी जवळ असलेले गड्डीगोदाम मेट्रो स्थानक गाठले. तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. स्थानकापासून १०० मीटर मेट्रो रुळाने जायचे होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला व अखेर परवानगी मिळाली.

हेही वाचा : “ये दिल मांगे…” व्हॅलेंटाईन डेनिमित्त अकोल्यात झळकले वंचितचे रेड बॅनर; राजकीय संदेश की…

हरीश किनकर व मेट्रोचा एक कर्मचारी गड्डीगोदाम स्थानकावरुन मेट्रोत बसले. १०० मीटर गेल्यावर मेट्रो थांबवली. दोघेही त्यातून उतरले व रुळावरून चालत जात खाली लटकणाऱ्या पोपटाला किनकर यांनी जीवदान दिले. या पोपटावर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू आहे. पोपट मांजामध्ये अडकल्याची माहिती पक्षीप्रेमींनी आम्हाला दिली होती. त्यानंतर लगेच वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली. मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन लगेच एक मेट्रो ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मेट्रो व्यवस्थापनाने सांगितले.

Story img Loader