नागपूर : वर्ष १९९५… महिना सप्टेंबर.. याच दिवशी एक अभूतपूर्व चमत्कार घडला होता. गणपती दूध पितो हे लोण देशभरातच नाही तर देशाच्या बाहेरही पोहोचले. तेव्हा मोबाईलही नव्हता आणि सोशल मिडियासुद्धा नव्हता. तरीही ही वार्ता पसरली आणि अनेकांनी आपल्या घरच्या गणपतीची परीक्षा घेतली. पण, येथे परीक्षा घेण्याचा प्रश्नच नव्हता. भक्ताच्या भक्तीला गणपती पावला आणि प्रसादाचा नारळ फोडताच मुकुट, एकच दंत, सोंड अगदी हुबेहुब गणपती बाप्पाचा आकार निघाला.

हेही वाचा : यवतमाळच्या झरीजामणीत विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नारळाला शुभ फळ मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळात जसे पाणी असते, तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नागपुरातील सिव्हील लाईन्स परिसरातील रहिवासी आणि वन्यजीवप्रेमी व्यंकटेश मुदलीयार यांच्याघरी गणपती विराजमान झाले होते. अनंत चतुर्दशीला विसर्जनाची पूर्ण तयारी झाली असताना त्यांनी प्रथेनुसार नारळ फोडला. नारळ फोडल्यानंतर ते जागीच स्तब्ध झाले. कारण त्या नारळातून हुबेहुब गणपतीसदृश्य आकार निघाला. मुकूट एकदंत आणि सोंडेचा आकार म्हणजे त्यांच्यासाठी चमत्कारच होता. त्याहीपेक्षा त्यांच्या भक्तीला गणपती पावला, अशीच चर्चा यावेळी रंगली होती.

Story img Loader