नागपूर : बीड आणि परभणीच्या दुर्दैवी घटना राज्य सरकार प्रायोजित आहेत. जनतेचे लक्ष मूळ विषयापासून विलचित करण्यासाठी सरकार ठोस भूमिका घेत नसून दोन्ही प्रकरणे तापत ठेवत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचाची गुंडांनी हत्या केली. परभणी येथे आंदोलक युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांना महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. सरपंच हत्येप्रकरणी जनता आंदोलन करीत आहे. त्याबाबत पटोले यांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले, बीड आणि परभणी प्रकरणामुळे सरकार प्रायोजित जंगलराज निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. या घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. सरकार मात्र दोन्ही घटनांमागच्या मू‌ळ मुद्याला बगल देण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापत ठेवत आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…

मंत्रिमंडळातील एका सदस्यावर आरोप होत आहे. सरकारकडे संपूर्ण माहिती आहे. पण, मंत्रिमंडळातून संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही. काँग्रेस सरकारच्या काळात मंत्र्यांवर असे आरोप झाल्यानंतर तातडीने राजीनामे दिले जात होते. आता मनमानी सुरू आहे. जंगलराज आहे. जनतेने कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!

मस्साजोग प्रकरणी महायुतीत फूट

अजित पवार यांचा मंत्री खुनात आरोपी आहे, असा आरोप भाजपचे आमदार सातत्याने करीत आहेत. सरपंच हत्या प्रकरणात महायुतीत फूट पडली आहे. पण, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या फुटीचे वृत्त पसरवत आहेत, असेही पटोले म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हा आमचा विषय नाही, देश धोक्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत. निवडणुका होतात की नाही ही शंका आहे. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पाहू, परभणी प्रकरणात एका तरुणाचा जीव गेला. मुख्यमंत्री म्हणतात तो दम्याचा रुग्ण होता. त्या आजाराने त्याचा मृत्यू झाला. त्याबाबत आम्ही हक्कभंग आणणार आहे. सरपंच खून प्रकरणात कराड याचा हात असल्याचा आरोप होत आहे. कराड यांचे संबंध एका मंत्र्याशी आहेत. त्यामुळे कराडला या प्रकरणापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचे दिसून येते, असा आरोपही पटोले यांनी केला.

Story img Loader