नागपूर : मोदी सरकारने कापड उद्योजकांना कापूस स्वस्त मिळावा म्हणून ११ टक्के आयतकर माफ केल्याने परदेशातून कापूस मोठ्या प्रमाणात भारतात आला, देशातील कापसाचे भाव पडले आणि परिणामी कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात ४६० आत्महत्या झाल्या, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. यामुळे उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. दुसरीकडे विविध रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन जरी घटले असले तरी बाजार योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते पण ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. पिक विमा काढुन सुध्दा तो मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. याच कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्हात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Sharad Pawar Hinganghat, Sharad Pawar news,
मतदान झाल्याबरोबर सरकारी योजनांचा खरा चेहरा…. शरद पवारांनी सांगितले भविष्यात काय घडणार?

हेही वाचा : अकोला : पारस येथील सौरऊर्जा प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध, विस्तारित औष्णिक प्रकल्पासाठी आग्रही; …तर रस्त्यावर उतरून निषेध

राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहे. एकटया यवतमाळ जिल्हयाचा विचार केला तर सन २०२२ मध्ये एकुण २७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २०२३ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत तब्बल १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. इतक्या मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्यसह केंद्रातील भाजपा सरकार यावर काही बोलण्यास तयार नाही.