नागपूर : आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या विचारधारा मात्र वेगळ्या आहेत. जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये जे निर्णय होईल त्या जागा आम्हाला लढू. त्या किती असतील हे अजून ठरलेले नाही. असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नागपूरमध्ये म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुश्रीफ नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहे. मात्र आम्ही किती जागा लढणार यांचा निर्णय झाला नाही.
हेही वाचा : वाढदिवसाच्या पार्टीनंतर घडलं अघटीत! कार अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
पाचही राज्यात झालेल्या निवडणुकीचे निकालामध्ये मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये भाजपाला यश मिळेल अशी स्थिती आहे. रविवारी कुठल्या राज्यात कोणाची सत्ता येईल ते कळणारच आहे , असे मुश्रीफ म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल असे विरोधक बोलत असले तरी गेल्यावेळी सुद्धा ते तसेच बोलत होते. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले आणि पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचे सरकार येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.