नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशातून ना सामान्यांना काही मिळाले, ना नोकरदारांना, ना मोर्चेकऱ्यांना, ना शेतकऱ्यांना, ना गरीब दुर्लक्षितांच्या काही हाती लागले. फक्त नेत्यांनी एकमेकांची उणी दूणी काढत सत्ताधारी मंत्र्यांनी आपापल्या खुर्च्या वाचविण्याचे काम केले. त्यामुळे हे अधिवेशन अर्थहिन ठरल्याची टीका करीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आदित्य ठाकरे नर्सरीचा मुलगा”, नितेश राणे यांची टीका

आरोग्य विभागातील भ्रष्टाचारावर लक्ष वेधत विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, आरोग्य विभागातील स्वच्छतेचे टेंडर एन वेळी का रद्द केले, असा सवालही केला. आरोग्य विभागातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याचे निनावी पत्र दाखवत त्यांना मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या इंसेंटिव्ह वरही आरोग्य मंत्री तीन हजार रुपये मागतात. अन्यथा त्यांना इन्सेंटिव्ह मिळत नाही, याचाही पुरावा दाखविला. महात्मा फुले जीवनादायी आरोग्य विमा योजनेतही पैशांशिवाय साधा कागदही पुढे जात नाही, असा आरोप करीत ते म्हणाले, तलाठी परिक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येकी ३० लाख रुपये मागणी होत असल्याचेही पवार म्हणाले, या अधिवेशनात कुठल्याही विभागाने जनतेला न्याय दिला नाही. मराठ्यांच्या संदर्भात फेब्रुवारीपर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळ वाढवून घेत वेळ मारून नेली. मात्र २४ नंतर भडकणाऱ्या आगामी आंदोलनाला सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ncp mla rohit pawar said this winter session is meaningless mnb 82 css