नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली. देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी पुष्कर पोरशेट्टिवार यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : खासगीकरणाच्या विरोधात वंचित आक्रमक; अकोल्यात काढला इशारा मोर्चा
या संदर्भात एक निवेदन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सत्तेचा दुरुयोग होता कामा नये, यासाठी संबंधितांवर वेळीच कारवाई आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
First published on: 18-10-2023 at 18:56 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ncp sharad pawar faction demands strict action against bjp worker who misbehave with deputy police commissioner rahul madne rbt 74 css