नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणाबाबत गंभीर आरोप नामदेवराव जाधव यांनी केला होता. नामदेवराव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंद करावा अशी मागणी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरद पवार गट) शुक्रवारी नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांच्या नेतृत्वात ही तक्रार करण्यात आली. मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ शकते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, असे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा : ‘ओबीसीं’च्या यादीत आणखी काही जातींच्या समावेशाची शिफारस; राज्य सरकारचा राज्य मागासवर्ग आयोगाकडे पुन्हा प्रस्ताव

या यावेळी रमण ठवकर, प्रशांत बनकर, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, मिलिंद वाचनेकर, कादिर शेख, रुपेश बांगडे, विनय मुदलियार, नथुलाल दारोटे, रियाज शेख, सुशांत पाली, अमित जेठे, नमोहर निखार, हर्षल खडसकर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.