नागपूर : विवाहानंतर मिळणारे विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक नवविवाहितांवर गेल्या काही दिवसांत प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. त्यात अनेक नवदाम्पत्य परदेशी नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण असे म्हणायची वेळ आली आहे. विवाहानंतर विवाह नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे महापालिकेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र विभागात ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो. मात्र, अर्ज केल्यानंतर त्यांच्यावर दोन ते अडीच महिने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. साधारणत: तुळशीपूजनानंतर लग्न सराई सुरू होऊन जून महिन्यापर्यंत लग्नांचा धडाका सुरू असतो. यानंतर सर्वच नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी ही बंधनकारक असते.

हेही वाचा : “ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया

loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
MPSC has made an important change in Maharashtra Non-Gazetted Group B and Group C Services Examination
‘एमपीएससी’ गट- ‘क’ सेवा परीक्षा, निकालाबाबत मोठी बातमी, नवीन अर्जदारांसाठीही महत्त्वाचे
recruitment of total 480 posts under various departments in maharashtra govt
नोकरीची संधी : शासनाच्या विभागांत नोकरीची संधी
article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष
maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?
BJP leader son marriage
भाजपा नेत्याच्या घरी येणार पाकिस्तानी सून; नुकताच पार पडला ऑनलाईन विवाह; पाहा VIDEO

यासाठी महापालिकेत अर्ज केल्यानंतर त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र मिळवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया राबवण्यासाठी किमान एक महिना लागतो. मात्र, त्यानंतर महापालिकेत नवविवाहितांना विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दोन ते अडीच महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक नव्या वैवाहिक जोडप्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ज्या दिवशी विवाह आहे त्याच दिवशी संबंधित नवदाम्पत्याच्या विवाहाच्यावेळी मंगल कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र देण्याची योजना सुरू केली. यासंदर्भातील प्रस्तावही तयार करण्यात आला होता. त्यासाठी विवाहापूर्वी नवविवाहितांना प्रमाणपत्रासाठी अर्ज व अन्य कागदपत्रे झोन कार्यालयाकडे सादर करावी लागणार होती. जयपूरच्या धर्तीवर ही योजना राबवली जाणार असताना गेल्या दोन वर्षापासून ही योजना मात्र केवळ कागदावरच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील दहाही झोनमध्ये ५० च्यावर नवदाम्पत्यांनी अर्ज केले आहे.

हेही वाचा : त्रुटीची पूर्तता, तरीही जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेना; शिवसेना आक्रमक होताच समितीचे अध्यक्ष म्हणतात…

तुळशीपूजनानंतर तर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे विवाह प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढणार आहे. मात्र, महापालिकेच्या थंड कारभारामुळे अनेक नवविवाहितांना प्रमाणपत्रासाठी प्रताक्षा करावी लागणार आहे. अनेक नवदाम्पत्य विवाहानंतर परदेशी जातात. त्यांना सुद्धा तत्काळ विवाह प्रमाणपत्राची गरज असल्यामुळे आता ज्या दिवशी विवाह असेल त्याचवेळी मंगल कार्यालयात किंवा ज्या ठिकाणी विवाह असेल तिथे जाऊन संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणपत्र नवदाम्पत्यांना दिले तर अनेकांना सोयीचे ठरणार आहे. परंतु, महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. महापालिकेत अनेक जोडप्यांकडून झोन कार्यालयात विचारणा केली जात असताना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ लागेल, असे सांगितले जात असल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन सोय असताना महापालिकेत इतका उशीर का लागतो असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.