नागपूर : विवाहानंतर मिळणारे विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक नवविवाहितांवर गेल्या काही दिवसांत प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. त्यात अनेक नवदाम्पत्य परदेशी नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण असे म्हणायची वेळ आली आहे. विवाहानंतर विवाह नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे महापालिकेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र विभागात ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो. मात्र, अर्ज केल्यानंतर त्यांच्यावर दोन ते अडीच महिने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. साधारणत: तुळशीपूजनानंतर लग्न सराई सुरू होऊन जून महिन्यापर्यंत लग्नांचा धडाका सुरू असतो. यानंतर सर्वच नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी ही बंधनकारक असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा