नागपूर : नागपूर – चंद्रपूर आणि नागपूर – वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. आता तीन वर्षांत या पुलाचा काही भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नागपूरहून हा राष्ट्रीय महामार्ग पुढे हैदराबादकडे जातो. तसेच विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे हा अतिशय वर्दळीचा मार्ग असून वाहनाच्या कित्येक किलोमीटर रांगा लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुटीबोरी येथे अगदी चौकातील पुलाचा काही भाग सुमारे अर्धा फुट खचला आहे. या पुलाचा ‘मटेरियल’ खाली पडत आहे. आज सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर सुरुवातील एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली आहे. परिणामी ही वाहतूक बुटीबोरीच्या मुख्य चौकातून वळवण्यात आली आणि वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे.

हेही वाचा : पालकमंत्री पदाचा वाद, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती; तर बीडच्या घटनेवर म्हणाले…

२४ तासात त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा वाहतूक कोंडी

मुंबई, ठाणे, उरण, गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील घाटरस्त्याचे काम प्रस्तावित आहे. गोदामांच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मागापैकी हा एक मार्ग आहे. या मार्गावर अनेकदा अवजड वाहने बंद पडण्याच्या अथवा पलटी होण्याच्या घटना घडत असतात. या घटनांचा परिणाम वाहतुकीवर होवून वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.

हेही वाचा : अकोला : जप्त आरा मशीनसाठी तब्बल २३ वर्षे संघर्ष; नेमकं प्रकरण काय?

पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.

“एक किलोमीटर रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर वाहतूक वळवण्याचा विचार केला जाईल. “

वैभव जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी (वाहतूक)
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur nitin gadkari butibori flyover collapsed 1 km traffic jam on national highway rbt 74 css