नागपूर : नेत्यांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम हीच त्यांची संपत्ती आहे. पण, हे प्रेम सहजासहजी मिळत नाही. शरद पवारांकडे पाहून प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की त्यांनी मलाच सांगितले की कामाला लागा, मात्र तिकीट भलत्यालाच मिळते, अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “मोहनदास गांधी मुस्लीम पुत्रच!” संभाजी भिडेंचा पुनरुच्चार; मुस्लीम धर्माविषयी बोलताना जीभ घसरली

हेही वाचा – रेल्वे विलंबास तांत्रिक बिघाडाचे कारण ६० टक्के 

जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे बावनकुळे चॉकलेट वाटत नाहीत. तरी सल्ला देतो, चांगले मिळण्याची अपेक्षा करा, पण नाही मिळाले तर दुःख नाही अशा पद्धतीने कामाचा आनंद घेत रहा. कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, आपल्याला जेव्हा जबाबदारी मिळते ती आपण प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. अध्यक्ष हा माजी अध्यक्ष होतो, खासदार हा माजी खासदार होतो, पण कार्यकर्ता हा कधीच माजी कार्यकर्ता होत नाही, तर कार्यकर्ता हा कायम कार्यकर्ता असतो, असेही गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur nitin gadkari commented on sharad pawar and party workers in an event vmb 67 ssb
Show comments