नागपूर: सध्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी भाजप विकासाच्या नावावर मते मागत आहे. २०१४ नंतरच नागपूरचा विकास झाला असा दावा एका बड्या नेत्याने अलीकडेच एका जाहीर सभेत केला. केंद्रातील भाजपचे नेते प्रत्येक सभेत विकासाचा घोष लावतात व त्यात मेट्रोचा आवर्जून उल्लेख करतात. सिमेंट रोडही आम्हीच बांधले हा दावा तर त्यांचा कायम असतो. तो मान्य केला तरी प्रत्यक्षात ज्या गोष्टींचा दावा केला जातो त्याची सध्यस्थिती तरी जाणून घेतलेली बरी. २०१४ नंतर महामेट्रोने बांधलेला मनीषनगर भुयारी मार्ग सध्या अंत्यत ‌वाईट अवस्थेत असून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा बळी ठरला आहे. भऱ् दिवसा या मार्गावरील दिवे बंद असल्याने तो काळोखात बुडालेला असतो. देखभाल दुरुस्ती अभावी ही वेळ आली असून यामुळे या मार्गांवर अपघात होण्याचा धोका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन नागपूर म्हणून म्हणन नावारुपास आलेल्या मनीषनगर-बेसा या भागाला वर्धा मार्गाशी जोडण्यासाठी सोमलवाडा येथे भुयारी मार्ग बांधण्याची संकल्पना मांडण्यात आली. खरे तर हे काम सार्वजनिक बांधकाम किंवा महामार्ग विकास प्राधिकरणाचे होते. कुठलाही संबध नसताना हे काम महामेट्रोला देण्यात आले. अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी असलेले हितसंबध कायम ठेवून या पुलाची बांधणी केली. त्यात अनेक दोष आहे. मात्र जेव्हा या पुलाचे उद्घाटन होणार होते तेव्हा मात्र महामेट्रोच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व त्यांच्या निकटच्या अधिकाऱ्यांनी हा भुयारी मार्ग देशातील अशा प्रकारचा ऐकमेव असेल. त्यात पाणी साचणार नाही, तेथील दिवे बंद होणार नाही, अपघात मुक्त प्रवास या पुलाखालून असेल असे अनेक दावे केले होते. प्रत्यक्षात त्यातील एकही खरा उतरला नाही. पावसाळ्यात सर्वात प्रथम याच भुयारी मार्गात पाणी साचते. साधा पाऊस झाला तरी तेथून वाहने काढणे अवघड असते. आता तर ऐन दिवाळीत या पुलाखाली दिवसा आंधार असतो कारण तेथील पथदिवे बंद आहेत. विशेष म्हणजे महामेट्रोच्याोकाही अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नाही. भुयारी मार्गात दिवसाही पथदिवे लाावे लागतात हेच मुळेत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. शुक्रवारी दिवसभर या पुलाखाली अंधार होता. एका व्यक्तीचा तेथे घसरून अपघात झाला. त्यांने माध्यांना ही माहिती दिली. वर्तमान पत्रात काळोखाचे छायाचित्र प्रकाशित झाले. मात्र महामेट्रोचे अधिकारी ढिम्म. महामेट्रोच्या जनसंपर्क विागाशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणेच ‘नरो वा कुंजोरवा’ अशा पद्धतीचे उत्तरे मिळाली. या प्रकरणाचा दोष कोणाचा हे सांगायला हा विभाग तयार नाही.

हेही वाचा : ‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महामेट्रोने देखभाल दुरुस्तीचे काम नागपूर महापालिकेकडे सोपवले होते.मात्र महामेट्रोच्या एका संचालकांनी ते पुन्हा महामेट्रोकडे घेतले. मात्र देखभालदुरुस्कीच्या नावावर सध्या काय सुरू आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. लोकांना त्रास होतो हे पाहायलाही अधिका-यांना वेळ नाही.

हेही वाचा : उमेदवार म्हणतात राज ठाकरेंकडून वैदर्भियांची फसवणूक

अपघाताचा धोका

मनीषनगर भुयारी मार्ग हा दोन वस्त्यांना जोडणारा असून तेथे दिवसभऱ् वर्दळ असते. रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालील वर्दळ अधिक वाढली आहे. पण वाहतूक नियंत्रित करणे असो किंवा पुलाखालील आवश्यक सुविधा देणे असोत महामेट्रोने याकडे पाठ फिरवली आहे. तरही निवडणुकीत महामेट्रोचा उदोउदोकेला जातो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur no lights at manish nagar mahametro under bridge chances of accident cwb 76 css