नागपूर : मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेवरील कॉटन मार्केट स्थानक २१ सप्टेंबर २०२३ पासून प्रवासी सेवेत रूजू होणार आहे. प्रवासी सेवेत असणारे हे मेट्रोचे ३७ वे स्थानक असेल. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच कॉटन मार्केट स्थानकला भेट दिली होती व तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी येथून प्रवासी सेवा सुरु करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र महामेट्रोला प्रदान केले होते. त्यानंतर महामेट्रोने वरील निर्णय घेतला.
हेही वाचा : नोकरी सांभाळून ‘ते’ देतात पोलिस, सैन्य भरतीचे मोफत धडे; एकाच प्रयत्नात १४ अग्निवीर, २५ जण पोलीस दलात
मेट्रोचे सध्या ३६ स्थानके प्रवासी सेवेत होते. त्यात वर्धा मार्गावरील १७ तर हिंगणामार्गावरील २० स्थानकांचा समावेश आहे. आता त्यात कॉटन मार्केट स्थानकाच्या निमित्ताने आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. कॉटन मार्केट स्टेशन परिसरात भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल, शासकीय कार्यालय, तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे या स्थानकाचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे.