नागपूर : गेल्या महिन्यांपासून नागपूर विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार वारंवार समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपासून दोन प्रवाशांनी दोन लाखांचे सोने गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली होती. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा चर्चेत आले आहे. सीमाशुल्क विभागाने तस्करीच्या सोन्याचे आणखी एक प्रकरण उघड केले आहे.

हेही वाचा : हद्दच झाली… आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे… ‘या’ जिल्ह्याने काढली जाहिरात

नागपूर विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोहम्मद अहमद नावाच्या एका तस्कराला शारजाहून एअर अरेबियाच्या फ्लाइट क्रमांक जी९-४१५ ने पहाटे ४ वाजून १० वाजता नागपूर विमानतळावर आल्यावर अटक केली. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट होता आणि तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने “कॉफी मेकर मशीन”मध्ये सोने लपवून आले होते. प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर विमानत‌ळावर सोन्याची तस्करी रोखण्याची गेल्या १० दिवसांत ही दुसरी घटना आहे. माशुल्क अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याच्याकडील वस्तूंची स्कॅनरने तपासणी केली. त्यानंतर “कॉफी मेकर मशीन” उघडले त्यामध्ये प्रत्येकी १७४८ ग्रॅम वजनाचे दोन दंडगोलाकार आकाराचे सोने आढळले.