नागपूर : खासदारांचे निलंबन आणि राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि तरुणांसह कुणाच्याही हाती काही आले नसल्याचा आरोप करत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांनी काळ्या फिती बांधल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधी पक्षाच्या आमदारांनी यावेळी ‘शेतकऱ्याला मदत मिळाली का?.. नाही.. नाही.. नाही.., पेपरफुटीवर कडक कायदा झाला का?.. नाही.. नाही.. नाही…, परीक्षा फी कमी झाली का?.. नाही.. नाही.. नाही.., अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., आशा सेविकांचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., संगणक परिचालकांचे प्रश्न सुटले का?.. नाही.. नाही.. नाही.., होमगार्डचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्या मान्य केल्या का? नाही.. नाही.. नाही.., महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचे प्रश्न सोडवले का? नाही.. नाही.. नाही.., खेळाडुंना थेट नियुक्ती दिली का? नाही.. नाही.. नाही.., आदिवासी बांधवांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., राज्यातील पोलीस पाटील यांच्या मागण्यांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., १०२,१०८ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्या मान्य केल्या का? नाही.. नाही.. नाही.., शिक्षक भरती सुरु केली का? नाही.. नाही.. नाही.., प्राध्यापक भारती केली का? नाही.. नाही.. नाही.., शेतकरी आत्महत्या थांबल्या का? नाही.. नाही.. नाही.., महिलांसाठी शक्ती कायदा आणला का? नाही.. नाही.. नाही.., ड्रग्सवर नियंत्रण आणते का? नाही.. नाही.. नाही.., आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या का? नाही.. नाही.. नाही.., कापूस- संत्रा आणि इतर सेट उत्पादक सेटकरांना न्याय मिळाला काय? नाही.. नाही.. नाही…’ आशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा : नागपूर हादरले! घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार

सोबत खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गाळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत केंद्र सरकारच्या विरोधातही संताप व्यक्त केला गेला. आंदोलकांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, सतेज पाटील, रोहित पाटील आणि इतरांचाही समावेश होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur opposition mla protest on last day winter session raises slogans against ruling party mnb 82 css