वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर केलेली १२२०१८९ मतांची आकडेवारी खरी की यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील २,२२५ बुथवर झालेल्या मतदानाची आकडेवारी खरी, याबाबत पेच निर्माण झाला असून बुथनिहाय मतदानात राळेगाव आणि वाशीम विधानसभा मतदार संघात एकूण २५ मते वाढविण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यामुळे ही मतमोजणी थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम, यवतमाळ, राळेगाव, कारंजा, दिग्रस, पुसद या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या बुथनिहाय मतदानाची आकडेवारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या आकडेवारीत कमालीचा फरक आहे. २५ मते ही अधिकची दिसत असून ती कुठून आली, असा प्रश्न उपस्थित करीत हा घोळ आधी दूर करावा व त्यानंतर मतमोजणी घ्यावी. तोपर्यंत चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉ. राठोड यांनी केली आहे.

हेही वाचा : एका लाखाच्या मोबदल्यात चार लाख! फेसबुकवर जाहिरात पाहिली अन् चप्पल विक्रेता…

३१ मे रोजी सुनावणी!

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून शुक्रवार, ३१ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. याचिकाकर्ते प्रा.डॉ. अनिल राठोड यांची बाजू जेष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. मोहन गवई यांनी न्यायालयात मांडली असून आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur petition filed in high court to stay on counting of votes of yavatmal washim lok sabha constituency pbk 85 css