नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमधून (नासुप्र) जुने दस्तावेजांची चोरी करत बनावटी कागदपत्रांवरून प्लाॅटची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सदर पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणात तपासात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता असून त्यात नासुप्रचे काही अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये प्रवीण सहारे (गोधनी), पवनकुमार जंगेला (मनीषनगर), अथर्व भाग्यवंत (गोपालनगर बसस्थानक), प्रतिभा मेश्राम (अभ्यंकर चौक), कार्तिक ऊर्फ रजत लोणारे (लालगंज), सिद्धार्थ वासुदेव चव्हाण (स्नेह काॅलनी), मोहम्मद रियाज ऊर्फ बबलू अब्दुल रजिफ, नासिर हसन खान, इमरान अली अख्तर अली, रूपेश वारजुरकर (रामेश्वरी रिंगरोड) या आरोपींचा समावेश आहे.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले

हेही वाचा : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम सिटीत पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीसच लाच घेतात तेव्हा…

पोलिसांच्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात सदर पोलीस ठाण्यात निशा जाजू यांनी एका फसवणुकीबाबत तक्रार केली होती. त्यात नारी परिसरात त्यांचे ३ हजार चौरस फुटाचा भूखंड आरोपींनी खोटे कागदपत्र तयार करून विक्री केले होते. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केल्यावर या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या प्रकरणात ११ आरोपींना अटकही केली आहे. तर या प्रकरणातील पाच आरोपी अद्यापही पसार आहेत. दरम्यान या प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता असून नासुप्रचे अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे पोलिसांनी काही अधिकाऱ्यांना नोटीस देऊन काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

हेही वाचा : नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ! पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे पुन्हा गडचिरोलीची धुरा; अधीक्षकपदाच्या कार्यकाळात ५५ नक्षलवाद्यांना कंठस्नान !

कागदपत्र जुने दिसावे यासाठी नामी युक्ती

आरोपींकडून नासुप्रमधील कागदपत्रांची चोरी करून त्याच्या आधारावर बनावटी दस्तावेज तयार केले. हे कागदपत्र जुने दिसावे म्हणून आरोपींकडून चहाचे पाणी कागदावर लावण्याची युक्तीही शोधून काढण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.

Story img Loader