नागपूर : शहरातील देहव्यापार करणाऱ्या तरुणींनी ग्रामीण भागातील ढाबे, हॉटेल आणि लॉजवर देहव्यापार सुरु केला आहे. सावनेरातील रॉयल लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात एका तरुणीला ताब्यात घेतले असून दोन आंबटशौकीन युवकांनाही अटक करण्यात आली. अरुण मदनमोहन रुषिया (जुना धान्यगंज, सावनेर) आणि रंजीत मारोतराव वानखडे (२९, झिल्पा. ता. काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार

गेल्या अनेक महिन्यांपासून सावनेरातील रॉयल लॉजवर सेक्स रॅकेट सुरु होते. या लॉजवर नागपुरातील अनेक तरुणी वेश्याव्यवसाय करीत होत्या. त्यामध्ये काही महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे. सोमवारी ग्रामीण पोलिसांनी लॉजवर छापा घातला. यावेळी एका तरुणीसह रंजीत वानखडे हा देहव्यापार करताना आढळला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ती तरुणी उच्चशिक्षित असून आर्थिक स्थितीमुळे ती वेश्याव्यवसाय करीत होती. तिला प्रतिग्राहक १०० रुपये देण्यात येत होते. नागरिकांनीही या लॉजबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur police raid on royal lodge in saoner ongoing prostitution racket young highly educated girl rescued adk 83 css