नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मून युनिसेक्स सलून आणि स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात मसाजच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – बुलढाणा: पोलिसांच्या एकावन्न पदांसाठी पावणेसहाशे उमेदवारांची ‘परीक्षा’
स्पा सेंटरची मालकीन मुस्कान उर्फ मनिषा अरविंद भारती (त्रिमूर्ती चौक) हिला अटक करण्यात आली. मनिषा भारती ही रेवतीनगर, बेसा येथे रतन इमारतीमध्ये मून युनिसेक्स सलून आणि स्पा सेंटर चालवित होती व येथे तरुणींना बोलावून देहव्यापार करवून घेत होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांच्या पथकातील अनिल मेश्राम यांनी केली.