नागपूर : दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध असून त्याविरोधात आज, सोमवारी आंदोलन करण्यात आले. वाहनतळाचे काम असलेल्या ठिकाणी आंदोलन एकत्र आले आणि बांधकाम बंद पाडले तसेच जाळपोळ केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने दीड तासात प्रकल्पाच्या कामाला स्थगितीची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ एप्रिल १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्या ठिकाणी आज पवित्र दीक्षाभूमी आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायी दरवर्षी विजयादशमीला येथे येतात. त्यामुळे दिक्षाभूमीचा विकास करण्याची योजना आखण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून पवित्र दीक्षाभूमीचा एकात्मिक विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार भूमिगत वाहनतळाचे काम सुरू झाले आहे.
हे वाहनतळ पवित्र सीक्षामूमीला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भूमिगत वाहनतळ बांधण्यात येऊ नये, अशी मागणी आंबेडकरी अनुयायांची आहे. त्यासाठी ते आज दीक्षामीवर दुपारी दोनच्या एकत्र आले आणि वाहनतळाचे काम बंद पाडले. तसेच तेथील ‘सेंट्रींंग’च्या लाकडी पाट्या जाळून टाकले. बांधकामाच्या सळई वाकवण्यात आल्या. हे आंदोलन सुमारे दीड तास सुरू होते. त्यानंतर विधानसभेत सरकारकडून या कामाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. पोलिसांनी आंदोलकांची मागणी मान्य झाल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. आंदोलक स्मारक समितीच्या विरोधात ‘ स्मारक समिती हटाव दीक्षाभूमी बचाव’ अशा घोषणा देत होते.
हेही वाचा: नागपूर : कागदावर ९० टक्के वृक्षारोपण, प्रत्यक्षात मात्र शून्य…’एनएचएआय’चा अजब कारभार
दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात राज्य शासनाने सुरुवातील शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. दीक्षाभूमीच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यास बांधकाम करीत आहे. नासुप्रच्यावतीने दीक्षाभूमी विकासासाठी सुधारित १९० कोटींचा आराखडा तयार केला. डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मघोषणेनंतर पावन झालेली, बौद्धांचे प्रेरणास्थान ऐतिहासिक दिक्षाभूमी आहे. या पवित्र दिक्षाभूमीवर ब्राम्हणी आक्रमण सुरू झाले आहे. संपूर्ण दीक्षाभूमीच हडपण्यासाठी ब्राम्हणवादी व त्यांचे दलाल नानाविध षढयंत्रे करीत आहेत. दीक्षाभूमीवर सौंदर्यीकरणच्या नावाखाली तोडफोड सुरू आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करून संविधानिक मार्गाने न्याय लढा देण्यासाठी दिक्षाभूमी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. आज याच समितीच्या नेतृत्वाखाली हजारो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर एकत्र आले होते.
हेही वाचा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मार्ट मीटरच्या बाजूने.. विरोध करणारी समिती म्हणते…
गेल्या काही दिवसांपासून दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामावर आक्षेप घेतल्या जात आहे. स्मारक समितीने वतीने आक्षेपकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न देखील केला. बांधकाम व सौंदर्यीकरण तांत्रिकदृष्ट्या किती मजबूत व फायद्याचे आहे हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु आंबेडकरी अनुयायींचे समाधान झाले नाही. स्मारक समितीने आज दीक्षाभूमी बचाव समितीच्या काही सदस्यांना चर्चेसाठी दीक्षाभूमीवर बोलावले. परंतु, मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले आणि त्यांचे आंदोलनात रुपांतर झाले.