नागपूर : भारतीय रेल्वेने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकाच वेळी प्रत्येकी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छता केली. मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या साफसफाईसाठी ही नवीन १४ मिनिटांची चमत्कार योजना १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केली. नागपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर बिलासपूर-नागपूर हि वंदे भारत ट्रेन आल्यानंतर सर्व प्रवासी उतरल्याची खात्री करण्यात आली.
हेही वाचा : गोंदिया : ९१५ गावांची नजर पैसेवारी ५० पैशाच्या वर, अतोनात नुकसान तरीही…
त्यानंतर १२.१५ वाजता साफसफाईची कारवाई सुरू झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अवघ्या १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत १२.२९ पर्यंत वंदे भारत ट्रेनची स्वच्छता पूर्ण केली. स्वच्छता मोहिमेत २५ सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, मजला आणि कोचच्या बाहेरील भागांसह आतील भागांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा चमू नेमण्यात आला होता.