नागपूर: नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसाच्या तडाख्यात महावितरणच्या बेसा उपकेंद्रात पाणी शिरले तर काही खोलगट भागातील वस्तीमध्येही पाणी शिरल्याने महावितरणने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज पुरवठा खंडित केला. तर काही भागात तांत्रिक दोष उद्भवल्याने वीज खंडित झाली. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांनी भर पावसात दुरुस्तीचे काम हाती घेतले.

नागपुरात शुक्रवारी रात्रीपासून कमी- अधिक पाऊस पडत आहे. त्यातच शनिवारी पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही भागात झाडाच्या फांद्या वीज यंत्रणेवर पडल्या. तर काही भागात वीज यंत्रणेत तांत्रिक दोष आला. त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरू- बंद होत असल्याचे चित्र होते. महावितरणच्या बेसा परिसरातील सुतगिरणी उपकेंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे बेसा केंद्रातील ३३ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथील अनेक भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.

in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 

हेही वाचा : वर्धा जिल्ह्यात पर्जन्यकोप! वाहतूक ठप्प, पिके पाण्यात…

दरम्यान पावसाच्या तडाख्यात ११ केव्हीचा कमल चौक , नवा नकाशा, १२ केव्ही जिंजर मॉल, क्षेत्र-क्लार्क शहर, ११ केव्हीचा नारी एसआरए कॉलनी, समता नगरचा भाग येथील वीज यंत्रणेत दोष निर्माण झाले. त्यामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. तर शहरातील पाणी शिरलेल्या खोलगट परिसरातही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागला. दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच भर पावसात त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या सह सर्व वरिष्ठ अधिकारी वीज व्यवस्थापन व दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेऊन होते. दरम्यान महावितरण कर्मचार्यांकडू पाणी शिरलेल्या वीज यंत्रणेतून पाणी काढण्याचे प्रयत्नही सुरू केले. तर तांत्रिक दोष असलेल्या भागात काही मिनीटात दुरुस्तीकरून वीज सुरू झाल्याचा महावितरणचा दावा आहे. पण ग्राहकांनी तासन्तास पुरवठा खंडित राहिल्याचा आरोप केला. वाठोडा येथील ११ केव्ही, नरेंद्र नगर, ताजबाग, शताब्दी फीडर, श्रीकृष्ण नगर फिडरमध्ये बिघाड झाला आहे. रामटेके नगर येथील ११ केव्ही फिडर खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडित झाला.

हेही वाचा : “गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांना केवळ उद्योगासाठी वेळ, जनता वाऱ्यावर ?”, काँग्रेसची टीका

पावसाळ्यापूर्वी महावितरणने ही कामे केली..

पावसाळ्यापूर्वी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विविध भागातील वीज वाहिन्यांवर आलेल्या वृक्ष व फांद्यांची माहिती गोळा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित विभागांशी समन्वय करून त्या छाटून घेतल्या. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, कापड, जाहिरात फलक, प्लास्टिक झेंडे काढण्याचे काम केले. सैल झालेले गार्डींग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील लोंबकळत असलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही केले. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास तेही बदलण्यात आले.

हेही वाचा : Bhandara updates: वीज कोसळून महिला मजूर ठार, शेतात रोवणी करताना…

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होण्याची मुख्य कारणे

वीज खांबावर असलेले चिनीमातीचे पीन किंवा डीस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर उन्हाळ्यात तापतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडल्यावर त्यास तडे जातात. यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय भूमिगत वाहिन्यांवर खोदकाम केल्याने त्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर परिणाम होत नाही, परंतु पावसाचे पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते आणि वाहिनीत बिघाड होते. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. त्याचप्रमाणे, वादळामुळे झाडे आणि मोठ्या फांद्या तुटून वीज तारा तुटतात किंवा त्यावर पडतात. यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय वीज यंत्रणेवर अतिवाढलेला भार, पक्षी आणि प्राणी वीज यंत्रणेवर बसून शॉर्टसर्किट निर्माण करणे तसेच चोरी आणि दुरुपयोग यामुळे देखील वीजपुरवठा खंडित होतो.\

वीज पेटी पाण्याखाली

किरणापूर गावातील एका घरघुती ग्राहकाच्या रोहित्राची वीज वितरण पेटी पोहरा नदीच्या पाणाखाली गेल्यामुळे १३० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने जवळपास ५ तास वीज पुरवठा बंद राहू शकतो.

Story img Loader