नागपूर : पावसाचे पाणी पंचशील चौकातील केअर रुग्णालयात शिरले. त्यामुळे पुढचा धोका बघता रुग्णालय प्रशासनाने येथील सुमारे ७० रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवले. दुसरीकडे मेडिकल, मेयोच्या आकस्मिक विभागातील पोर्चमध्ये पाणी तुंबल्याने येथून रुग्णालयात आत जाताना रुग्णांचे हाल झाले. केअर रुग्णालयातील डॉ. वैभव अग्रवाल आणि सहकाऱ्यांनी रुग्णाला धोका होऊ नये म्हणून काळजी घेतली. धंतोली परिसरातील इतर खासगी रुग्णालयांमध्येही रात्रभर झालेल्या पावसाने तारांबळ उडाली. मेडिकलच्या आकस्मिक विभागात तीन ते चार फूट पाणी साचले होते. येथे एक रुग्णवाहिका अडकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या रुग्णाला हलवतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. मेयोच्या आकस्मिक विभागाजवळही पाणी तुंबल्याने रुग्णांना भिजावे लागले. यावर्षी जीर्ण झालेली मलवाहिनी सुधारल्यामुळे वॉर्डात पाणी तुंबण्याचे प्रकार थांबल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मेयोतील सर्वात जुने असलेले सुभाष आणि जवाहर वसतिगृह या भागात वर्षानुवर्षांपासून पावसाचे पाणी साचते. दोन्ही जुन्या वसतिगृहांच्या आवारातील पावसाचे पाणी साचून या परिसराला तलावाचे स्वरूप आले.

हेही वाचा : वर्धा : नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून, प्रियकरावर संशय

रेल्वे रुग्णालयातील रुग्णही हलवले

रेल्वे रुग्णालयात पाणी शिरल्याने येथीलही रुग्ण इतरत्र हलवले. व्होकार्ट रुग्णालयाच्या प्राणवायू असलेल्या तळमजल्यात पाणी तुंबल्याने येथे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.