नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात घेता निवडणूक कर्मचाऱ्यांना आरोग्याचा प्रश्न आला तर त्यांना नजीकच्या खासगी अथवा इतर कोणत्याही इस्पितळातकॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवडणूक पूर्वतयारी संदर्भात मंगळवारी येथील बचत भवनात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठक घेतली. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देत असतात. एखादया कर्मचाऱ्याला गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर आरोग्य विभागाने तत्परतेने जवळच्या इस्पितळात नेऊन त्याला कॅशलेस सुविधा उपलब्ध करून उपचार केले जाणार आहे.

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. यात ग्रामीण भागात जी मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींनी ती व्यवस्था केली पाहिजे. ज्या ठिकाणी खाजगी शाळा आहेत, संस्था आहेत अशा संस्थांनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. विशेषत: मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा त्या मतदान केंद्राच्या परिसरात इतर काही वर्गखोल्या, हॉल असेल तर तिथे मतदारांना बसण्याची व्यवस्था पाहिजे. टप्प्या टप्याने त्यांना वेळेत मतदान करता येईल व उन्हात उभे राहण्याची गरज पडणार नाही. यातील काही प्रातिनिधीक मतदान केंद्र हे क्युलेस अर्थात रांगा नसलेली केंद्र म्हणून नियोजन करण्याचे जिल्हाधइकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

हेही वाचा : “संविधान बदलाल तर पहिला राजीनामा माझा”, अखेर आठवले गरजलेच!

दिव्यांगांसाठी व्हिलचेअर

जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा असणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक संस्थांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी व्हिलचेअर नसेल तर जिल्हा निवडणूक विभागातर्फे पर्यायी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.