नागपूर : वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करून माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे चोरटी वाळू विक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यामुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे ते कारवाई करणाऱ्यांना भीती दाखवण्याचे प्रयत्न करू लागले आहे. रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होते. ते रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस तैनात करण्यात आले आहे. वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यवर रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी कारवाईसाठी दोन पथके तयार केली.

हेही वाचा : भारतात निश्चित लक्ष्याच्या तुलनेत जलविद्युत निर्मिती कमी! केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार…

एका पथकाचे नेतृत्व सवरंगपते करीत होत्या. त्या कारवाईसाठी गेल्या असता त्यांच्यावर तस्करांच्या हस्तकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती पोलिसांना मिळाली असता ते घटनास्थळी आले. तेव्हा हल्लेखोर पळून गेले. या कारवाईत आठ ट्रक जप्त करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ramtek taluka sand mafia attacked on team who went to take action cwb 76 css