नागपूर : पावसाळ्यात विजेची मागणी वाढल्याने महानिर्मितीला जास्त वीजनिर्मिती करावी लागली. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा साठा कमी होत आहे. विशेष म्हणजे, खाणीत पाणी असल्याने कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातून पाऊस परतताच अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे वातानुकूलित यंत्र, कृषीपंप, पंखे, विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने मंगळवारी (१० ऑक्टोबर २०२३) दुपारी ३.२० वाजता राज्यात विजेची मागणी २८ हजार २९७ मेगावाॅटवर पोहचली. तर यंदा पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी नेहमीच्या तुलनेत जास्त असल्याने महानिर्मितीला प्रत्येक वर्षीच्या तुलनेत जास्त वीजनिर्मिती करावी लागली.

हेही वाचा : लोकजागर : पोशिंद्याची परवड!

वीजनिर्मिती वाढवली गेल्याने कोळशाचा वापरही वाढल्याने महानिर्मितीच्या केंद्रामधील कोळशाचा साठाही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. १८ सप्टेंबर २०२३ रोजी महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा ६.५० लाख मेट्रिक टन होता. तर कोल वाॅशरीजकडेही मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक असल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. हा साठा ९ ऑक्टोबरला खाली घसरून ५.९० लाख मेट्रिक टनवर आला. ९ ऑक्टोबरला महानिर्मितीच्या खापरखेडा केंद्रात ३ दिवस, पारस केंद्रात ६ दिवस, चंद्रपूर केंद्रात १ दिवस, भुसावळ केंद्रात ५ दिवस, परळी केंद्रात २.५ दिवस, नाशिक केंद्रात ३.५ दिवस, कोराडी केंद्रात ८ दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक होता.

“यंदाच्या पावसाळ्यात नेहमीच्या तुलनेत विजेची मागणी वाढल्याने जास्त कोळसा लागला. आता ऑक्टोबरमध्ये ही मागणी १० ऑक्टोबरला २८ हजार मेगावाॅटच्या वर होती. त्यामुळे महानिर्मितीने वीजनिर्मितीवर परिणाम होऊ नये म्हणून आधीच कोळशाची मागणीनुसार तरतुद केली आहे.” – राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.

हेही वाचा : “१२ ऑक्टोबरपूर्वी ३ कोटी रुपये जमा करा,” ठाकूर बंधूंना न्यायालयाचे आदेश; ताडोबा सफारी बुकींग फसवणूक प्रकरण

महानिर्मिती प्रकल्पातील कोळशाची स्थिती

(चार्टमधील संख्या दिवसांची)

प्रकल्प १८ सप्टेंबर ९ ऑक्टोबर
भुसावळ ३.५ ५.०
नाशिक ४.५ ३.५
परळी ३.५ २.५
पारस २.० ६.०
खापरखेडा २.० ३.०
कोराडी ८.५ ८.०
चंद्रपूर ३.० १.०

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur reduction in coal reserve of mahanirmiti project due to increased demand of electricity mnb 82 css