लोकसत्ता टीम

नागपूर: मंदिरातील वस्त्रसंहितेपेक्षा समाजापुढे असंख्य महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र, त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक विषय पद्धतशीरपणे चर्चेत आणले जात आहेत. देव कधीच तुम्हाला ५६ भोग मागत नाही किंवा दर्शनाला कुठले कपडे घालून यावे असेही सांगत नाही. मग, देवाच्या नावाने व्यवसाय करणारे मंदिरात कुणी कुठले कपडे घालावे हे सांगणारे कोण, असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या रेखा दंडिगे-घिया आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या वकील स्मिता सिंगलकर यांनी केला. गोरक्षण मंदिराच्या विश्वस्त ममता चिंचोळकर यांनी मात्र मंदिर हे ऊर्जास्त्रोत असून त्याचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी नीट कपडे घालूनच प्रवेश करावा, असे आवाहन केले.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
cm devendra fadnavis loksatta news
आमच्या कुटुंबात ‘तिच’ सर्वाधिक प्रगल्भ, फडणवीस कोणाबाबत बोलले?
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान रेखा दंडिगे, ॲड. स्मिता सिंगलकर आणि ममता चिंचोळकर बोलत होत्या. महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याच्या निर्णयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या निर्णयाच्या समर्थनार्थ ममता चिंचोळकर म्हणाल्या, मंदिर ही शक्तीकेंद्रे आहेत. तेथे ऊर्जा मिळते, दिशा मिळते. मंदिरांत प्रवेश करताना तुम्ही मंगलवेशच परिधान करा असे नाही.

हेही वाचा… यवतमाळ : पुण्याच्या प्रियकराचे कृत्य, प्रेयसीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर केले व्हायरल

मात्र, पावित्र्य भंग होणार नाही असे कपडे घालायला हवे. वस्त्रसंहिता केवळ मुलींसाठी नसून सर्वांसाठीच आहे, असेही त्या म्हणाल्या. यावर रेखा दंडिगे म्हणाल्या, महिला नोकरीसाठी बाहेर पडतात. घरी परत येताना त्याच कपड्यांवर देवळात जाऊन श्रद्धेने दर्शन घेतात. ते गैर कसे होऊ शकते. त्यांना बंधने घालणे योग्य नाही. ज्या निरीश्वरवादी आहेत परंतु तरीही मंदिरात जाऊ इच्छितात त्यांनी वस्त्रसंहिता का पाळावी? देव कधीही कुठले कपडे घालून यावे हे सांगत नाही. देवाला काय हवे ते त्याच्या नावाने व्यवसाय करणारेच ठरवतात असा आरोपही त्यांनी केला. ॲड. स्मिता सिंगलकर यांनीही वस्त्रसंहितेचा कठोर शब्दात विरोध केला. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते.

हेही वाचा… मुंबई-पुण्यातून सर्वाधिक वाहनांची चोरी; वाहने शोधण्यात नागपूर पोलीस ‘नापास’

आज समानतेची शिकवण देण्याची गरज असताना पुन्हा कपड्यांचे कारण पुढे करून मंदिर प्रवेश नाकारणे हे संविधानिक अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्याचेही हनन आहे. धार्मिक मिरवणुकांवरून आज स्पर्धा सुरू झाली आहे. मंदिरात कुणी कपडे दाखवायला जात नाही. आजचा समाज शिक्षित आहे. तरुणाईला काय करावे हे सांगायची गरज नाही, असेही ॲड. सिंगलकर म्हणाल्या.

पावित्र्याची व्याख्या काय- ॲड. सिंगलकर

भारत हा वैविध्यपूर्ण व धर्मनिरपेक्ष देश आहे. आज समाजापुढे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, बेरोजगार असे असंख्य प्रश्न आहेत. मात्र, सरकार अडचणीच्या ठरणाऱ्या अशा विषयांपासून लक्ष विचलित करण्यासाठी मंदिरातील वस्त्रसंहितेसारखे विषय काढत आहे. सभ्यता आणि पावित्र्याची नेमकी व्याख्या काय? ती कोण ठरवणार? पूर्ण वस्त्र घातले म्हणजे तुम्ही सभ्य नाहीतर असभ्य, असे कसे होणार? हा सगळा ढोंगीपणा आहे, असेही ॲड. सिंगलकर म्हणाल्या.

मंदिर म्हणजे पर्यटन केंद्र नाही- चिंचोळकर

मंदिरात येणारी तरुणाई जर फाटलेले जिन्स, शॉर्ट्स घालून येत असेल तर ते आपल्या संस्कृतीला शोभण्यासारखे नाही. मंदिरात येऊन तरुणाईने सेल्फी काढायला ते काही पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला, असे मत ममत चिंचोळकर यांनी व्यक्त केले.

Story img Loader