नागपूर : हुडकेश्वरमधील फुल व्यापारी भावंडाच्या घरात ६ सशस्त्र दरोडेखोर घुसले. वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावून मुलावर हल्ला करीत घरातील ८ लाख रुपये लुटून पसार झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्वरमध्ये घडली. अमित आणि स्वप्नील दुरुगकर हे दोघेही भाऊ फुलांचे व्यापारी असून हुडकेश्वरमधील ओमनगरात राहतात. शनिवारी मध्यरात्री स्वप्नील आणि त्याची आई खालच्या माळ्यावर झोपलेले होते. दरम्यान, ६ दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यांनी स्वप्नीलच्या आईच्या गळ्याला चाकू लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यांनी स्वप्नीलला आरडाओरड केल्यास आईला ठार मारण्याची धमकी दिली. काही वेळपर्यंत दरोडेखोरांना घरात गोंधळ घातला आणि स्वप्नीलवर चाकूने हल्ला करून घरातील ८ लाख रुपये लुटले आणि पळ काढला. काही वेळांना स्वप्नीलने शेजाऱ्यांना मदत मागितली. त्यांना ११२ वर फोन करून पोलिसांची मदत घेतली. मात्र, बराच वेळपर्यंत हुडकेश्वर पोलीस न पोहचल्यामुळे दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : नागपूर : धक्कादायक ! तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून देहव्यापार

टीप देऊन दरोडा

दुरुगकर यांच्या घरात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांना त्यांच्या घरातील वीज मीटर बंद करून घरात अंधार केला. त्यानंतर टॉर्च घेऊन घरात घुसले. पैसे ठेवलेल्या ठिकाणीच शोधाशोध केली. तसेच वृद्धेच्या गळ्यात जवळपास ३ लाखांचे दागिने असतानाही दरोडेखोरांनी दागिन्यांना हातही लावला नाही. वरील सर्व बाबी संशयास्पद असून कुणीतरी जवळच्याच व्यक्तीने टीप दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.