नागपूर : नागपूर ग्रामीणमधील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल साडे दहा लाखांची रक्कम पळवली. मंगळवारी पहाटे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री ३.३० वाजता एक चारचाकी वाहन सावनेरमधील बाजार चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमपुढे थांबले. त्यातून तीन ते चार आरोपी तोंडावर कापड बांधलेल्या अवस्थेत खाली उतरले. त्यांनी तेथे कोणीही नसल्याचे बघत गॅस कटर घेऊन एटीएम गाठले. त्यानंतर एटीएमचे दार बाहेरून लावून कटरने एटीएम कापले . त्यातील १० लाख ३० हजार रुपये रोख घेऊन आरोपी पसार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान पहाटे परिसरातील नागरिक येथे गोळा झाले. काहींना बँकेच्या एटीएममधून पाणी बाहेर येतांना दिसल्याने त्यांनी शोध घेतला. त्यांना एटीएम कापून त्यातून पैसे पळवल्याचे निदर्शनात आले. गॅस कटरने यंत्र कापतांना पाण्याचा वापर करण्यात आला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांनाही माहिती दिली. एटीएमचे काम असलेल्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.

हेही वाचा : स्नेहसंमेलनात अफझल खानाच्या वधाचे दृश्य दाखवल्याने विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली, हिंदुत्ववादी संघटनांकडून रोष व्यक्त

तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी तातडीने विविध चमूच्या मदतीने आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात येथे सुरक्षा रक्षक रात्री तैनात नसल्याचे पुढे आले. दरम्यान पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. चोरट्यांनी भर चौकातील एटीएम फोडल्याने येथील पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेचे गांभिर्य बघत येथे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार आणि इतरही अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur rupees 10 lakhs stolen from the sbi atm machine at saoner area in midnight mnb 82 css
Show comments