नागपूर : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. भिवगड गावापासून सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ३४० मध्ये संरक्षित वनात गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कल्पना चौधरी असे मृत महिलेचे नाव असून ती उमरेड तालुक्यातील भिवगड येथील रहिवासी होती.

भिवगड येथील महिला गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास संरक्षित वनात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या. कल्पना चौधरी यांच्यासोबत अन्य पाच महिला तसेच एक मजूर होता. डेकडीच्या परिसरात सर्व मजूर तेंदूपत्ता संकलन करत असताना झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने कल्पना चौधरी यांच्यावर हल्ला केला. तिच्या गळ्यावर बिबट्याने पंजा मारला आणि काही फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यातच तिचा मृत्यू झाला. सोबतच्या इतर महिलांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले. वनरक्षक रोहिनी गुरनुले यांनी घटनास्थळ गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मृत कल्पना हिला मुलगा आणि मुलगी असून पती उत्तम हे शेतमजुरीची कामे करतात.

way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
one transgender brutally murdered in Malkapur city
तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या; मलकापूर शहर हादरले
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
pune theur firing case marathi news
पुणे : थेऊर गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

हेही वाचा…अमरावती : शेअर बाजारात गुंतवणुकीच्‍या नावाखाली फसवणूक, तब्बल ३१ लाख ३५ हजारांची फसवणूक

नेत्रवन विज्ञान केंद्र डव्हाअंतर्गत भिवगड परिसरातील तेंदूपत्ता संकलनाचे कार्य ग्रामसभेला सोपवण्यात आले आहे. ११ मेपासून हे काम सुरू झाले. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाभळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे, वनपाल एस.डी. पाटे, वनपाल एस.डी. चाटे, व्ही.एम. अंबागडे आदी हजर होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तेंदूपत्त्याचे उत्पादन चांगले येते आणि तेंदूपत्ता तोडण्यासाठी कामगार पहाटेच जंगलात दाखल होतात.

हेही वाचा…चंद्रपूर : धक्कादायक! तीन दिवस वाघाच्या अवयवांचे तुकडे करून जाळले…

जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी तेंदूपत्ता हे उदरनिर्वाहाच्या साधनापैकी एक आहे. त्यामुळे उजाडल्यानंतर जंगलात जा असे निर्देश असतानाही अधिकाधिक तेंदूपत्ता मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून गावकरी भल्यापहाटे जंगलात जातात. गेल्या चार दिवसांत जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी आलेल्या तीन मजुरांवर वाघाने हल्ला करून ठार केले. दोन जण गंभीर जखमी झाले. आता बिबट्याने हल्ला केला. तेंदू संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांना वनविभागाकडून आवश्यक सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने जीवघेण्या घटना घडत आहेत. तेंदू संकलन ग्रामीण भागासाठी रोजगाराचे चांगले साधन आहे. मात्र, पहाटे अंधारात अशा दुर्दैवी घटना घडतच आहेत.

Story img Loader