नागपूर: समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. २०० दिवसानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनुसार पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळाली नाही. त्यामुळे हे कुटुंबिय नागपुरातील संविधान चौकात शुक्रवारी दुपारी राम नाम जप करायला बसले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फडणवीसांच्या कार्यालय परिसरात त्यांना जप करण्याची परवानगी नकारली गेली आहे. नागपूरहून- पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा १ जुलै २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ अपघात झाला होता. त्यात सर्वाधिक मृत वर्धा जिल्ह्यातील होते. अपघातानंतर उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाकडून ५ लाख व केंद्राकडून २ लाखांचीच मदत मिळाली.

हेही वाचा…काटेपूर्णा अभयारण्यात हजारो झाडांची कत्तल! उच्च न्यायालयाने वन विभागाला मागितले स्पष्टीकरण

पीडित कुटुंबियांनी वेळोवेळी स्थानिक आमदार, खासदार, राज्यपालांची भेट घेत मदतीची मागणी केली. मागणीमध्ये दोषी ट्रॅव्हल्स कंपनीची मान्यता रद्द करणे, अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्याही मागणीचा समावेश होता. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी विधानसभा-लोकसभेत प्रश्न मांडला. परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे वर्धेतील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले. तेथेही न्याय मिळत नसल्याने शेवटी प्रभू श्री राम यांच्याकडे साकडे घालण्यासाठी पीडित कुटुंबियांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) फडणवीस यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयापुढे दुपारी राम नाम जप सुरू केला आहे.

दरम्यान हे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापुढे होणार होते. परंतु शहर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस देत फडणवीसांच्या कार्यालयापुढे आंदोलन केल्यास दाखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाईची नोटीस दिली. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन संविधान चौकात केले जात आहे. परंतु दुपारी ४ वाजतानंतर आंदोलक न्यायासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या पुढे आंदोलनासाठी जाणार असल्याची माहिती चंद्रशेखर मडावी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. याप्रसंगी राम नाम जप करणाऱ्या पीडित कुटुंबियांमध्ये संजय गुप्ता, रसिका मार्कंडे, मदन वंजारी, कल्पना गुप्ता, परीजा मार्कंडे, निरू सोमकुवर आणि इतरांचा समावेश असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत कामगाराची आत्महत्या

“सध्या अयोध्येच्या माध्यमातून देशभरात राममय वातावरण आहे. आपले उपमुख्यमंत्री व गृहमंत्री हे राम भक्त आहे. त्यामुळे अपघात पीडित कुटुंबियांच्या ‘राम नाम जप’मुळे फडणवीसांना त्यांच्या घोषणेची आठवण होऊन ते पीडित कुटुंबियांना २५ लाख रुपये मदत करण्यासह दोषींवर निश्चित कडक कारवाई करतील.” – चंद्रशेखर मडावी, आंदोलक