नागपूर: नागपूर- छिंदवाडा रेल्वे मार्गावरील खापरखेडा रेल्वे क्राॅसींगवरून एक स्कूल बस ४० विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्याचवेळी रुळावरून वेगाने एक रेल्वे गाडी येत होती. अचानक रेल्वे फाटक बंद झाल्याने रुळावर स्कूलबस आणि एक कारही अडकली. विद्यार्थी बचावासाठी आरडा- ओरड करू लागले. उपस्थित नागरिकांसह रेल्वे इंजिन चालकाच्या समय सुचकतेमुळे वेळीच रेल्वे गाडी थांबल्याने विद्यार्थी बचावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खापरखेडा येथे महानिर्मितीचे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. येथे मोठ्या संख्येने स्थायी व कंत्राटी अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांच्या राहण्यासाठी जवळच महानिर्मितीची कर्मचारी वसाहतीचे गाळे आहे . तेथे राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मुलांची शाळेत ने- आण करण्यासाठी एका कंपनीला महानिर्मितीकडून स्कूलबसचे कंत्राट दिले गेले आहे.

हेही वाचा : Amravati Update : पतीने उसने दिलेले पैसे परत मागायला गेलेल्या महिलेवर बलात्कार….छायाचित्रे काढून पुन्हा….

दरम्यान नेहमीप्रमाने गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महानिर्मितीमध्ये कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांची ४० मुले घेऊन ही स्कूलबस पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून खापरखेडामधील वसाहतीच्या दिशेने जात होती. बस क्रमांक एमएच- ४०, बीजी- ७७३० ही खापरखेडा रेल्वे रूळ ओलांडत असतांना अचानक रेल्वे फाटक बंद झाले. त्यामुळे ही बस नागपूर- छंदवाडा रेल्वे मार्गावर रुळावरच अडकून पडली. बससोबत रुळावर एक खासगी कारही अडकली. याचवेळी रुळावरून छिंदवाडा- नागपूर प्रवासी रेल्वे गाडी वेगात खापरखेडाच्या दिशेला जात होती. ही रेल्वे गाडी बसच्या दिशेने वेगाने येत असल्याचे बघत बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह चालक व वाहक घाबरले. सगळ्यांनी बचावासाठी आरडा- ओरड सुरू केली. फाटकाजवळील एका सुज्ञ नागरिकाने प्रसंगावधान दाखवत धावत जाऊन जवळचे लाल रंगाचे कठडे रेल्वे रुळावर जाऊन ठेवले. दरम्यान रेल्वे इंजिन चालकाला रुळावर लाल रंगाचे कठडे दिसले. त्यामुळे त्याला शंका आल्याने त्याने तातडीने रेल्वेचे ब्रेक दाबले. काही अंतरावर जाऊन ही रेल्वे गाडी थांबली. गाडी थांबल्याचे बघून त्यातील विद्यार्थ्यांसह इतरांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर रेल्वे फाटकावरील नियुक्त रेल्वे कर्मचाऱ्याने एका बाजूचे फाटक उघडले. त्यानंतर रुळावर अडकलेली स्कूलबस आणि कार बाहेर काढली . त्यानंतर थांबलेली रेल्वे गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. दरम्यान बस निघत असतांना त्यातील विद्यार्थी आम्ही थोडक्यात बचावल्याचे सांगत उपस्थित नागरिकांचे आभार मानत होते.

हेही वाचा : अकोला : ‘द बर्निंग शिवशाही’चा थरार, ४४ प्रवाशांचा जीव…

रेल्वे फाटक ओलांडतांना कोणती काळजी घ्यावी?

भारतीय रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवासी आणि सामान्य नागरिकांना धोका टाळून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या जात असतात. पण, सामान्य नागरिक तरीही अनेकदा बेजबाबदारपणे स्वतःचा जीव जणू मुद्दाम धोक्यात घालत असतात. रेल्वे क्रॉसिंगसाठी फाटक बंद असतानाही लोक खाली वाकून रूळ ओलांडतात, सायकल वा बाईकही वाकून घेऊन जातात. तर काही कार व बस चालकही फाटक बंद होत असतांनाही त्यातून वाहच काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु सगळ्यांनी फाटकाच्या आत वाहन वा पायी जातांना आधी तेथून रेल्वे गाडी येत आहे काय? हे तपासूनच वाहन काढायला हवे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur school bus carrying 40 students stuck on railway track mnb 82 css