नागपूर : सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची बस उलटून मंगळवारी भीषण अपघात झाला. यामुळे संपूर्ण शाळांमधील एकूणच स्कूलबस व तिच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही अनेक अपघात नागपूरमध्ये घडले आहेत. २१ ऑगस्ट २०२४ ला जिल्ह्यातील कुही येथे एका स्कूलबसने भरधाव कारला धडक दिली होती.या घटनेत तीन विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेचा विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. ४ जुलै खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगजवळ शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी बस रुळावर अडकली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती.पण यामुळे तब्बल चाळीस विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले होते.

९ जुलैला नागपूरमधील रघुजीनगरजवळ एका भरधाव स्कूलबसला अपघात झाला होता. यात मुलांना काही धोका निर्माण झाला नाही पण बसने वृद्ध इसमाला चिरडले होते. ही घटनाही बसमध्ये बसलेल्या मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली होती. छत्रपती चौकातून जाणारा वळण मार्ग, आठ रस्ता चौकात इंजिनिअंरिंग कॉलेजची उलटलेली बस असे अनेक उदाहरणे देता येतील. मात्र यानंतरही स्कूल बस सुरक्षितेबाबत ना शाळा व्यवस्थापनाने लक्ष दिले ना वाहतूक पोलीस व आरटीओंनी. त्यामुळे मुलांना अशा बसेसमध्ये पाठवायचे काय असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. अनेक शाळांना भाड्याने स्कूलबसेस घेतल्या आहेत. त्या बसेसचे चालक भरधाव वेगात वाहने चालवतात. शाळेत वेळेत पोहचवणे हे या मागचे कारण सांगितले जात असले तरी मुलांच्या सुरक्षिततेचे काय ? हा प्रश्न उरतो. मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

हेही वाचा : धक्कादायक! घरातच देहव्यापाराचा अड्डा; महिलेने अल्पवयीन नात व तिच्या मैत्रिणीला…

वर्धामार्गावर अनेक धोके

वर्धामार्गावर सीबीएससी शाळा आहे. एका-एका शाळेच्या ३० ते ४० बसेस एकाच वेळी शाळा सुटल्यावर बाहेर पडतात. त्यामुळे वर्धामार्गावर वाहतूक कोंडी तर होतेच. या बसेसला अपघात होण्याचाही धोका असतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चिंचभवनमधील गर्दीचे देता येईल. या मार्गावरील एका सीबीएससी शाळेत जाण्यासाठी मुख्य मार्गावरून एकच रस्ता आहे. त्याच मार्गावरून दोन्ही बाजूंनी एकाच वेळी मोठी वाहने धावतात. मुख्य रस्त्यावर चढण्यासाठी एकच स्पर्धा लागते. हा अपघात प्रवणस्थळ घोषित केल्यावरही येथे एकही वाहतूक पोलीस सकाळी आणि शाळा सुटल्यावर हजर राहात नाही. त्यामुळे येेथे अपघात होण्याचा धोका आहे. यावर अनेकदा प्रकाश टाकूनही थातूरमातूर कार्यवाही करण्यात आली आहे. दैनिक लोकसत्ताने रस्त्यावरील शांळांचा प्रश्न अग्रक्रमाने सातत्याने मांडला. पण अजूनही प्रशासन ढिम्म आहे. सरस्वती शाळेच्या मुलांना झालेल्या अपघाताने तरी प्रशासन जागे होणार का ? असा सवाल केला जात आहे.