नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी दुसरी ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेतून झाल्याने रुग्णाला एकही रुपया खर्च लागला नाही. शस्त्रक्रिया झालेली ६० वर्षीय वृद्धा ही मध्यप्रदेशच्या सीमेवरील रहिवासी आहे. तिला छातीत दुखणे असल्याने नातेवाईकांनी एम्सच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आणले. येथे विविध तपासणीत तिच्या एका धमनीत तब्बल ८० टक्के ‘ब्लाॅकेज’ असल्याचे पुढे आले.

हेही वाचा : भंडाऱ्यात भर वस्तीत देहविक्री व्यवसाय

महिलेवर ‘ओपन हार्ट’ शिवाय पर्याय नसल्याचे पुढे आल्याने झटपट आयुष्यमान भारत योजनेतून प्रक्रिया करत तिच्यावर येथे नव्याने सुरू झालेल्या ‘सीव्हीटीएस’ विभागात ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. आता महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर झपाट्याने प्रगती होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान एम्समध्ये ह्रदयाच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया सुरू झाल्याने व आयुष्यमान भारत योजनेतूनही परप्रांतीय रुग्णांनाही त्यातून उपचार शक्य झाल्याने येथे येणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातील अत्यवस्थ गरीब रुग्णांना लाभ होत आहे.