नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वेदांग ज्योतिष विभागाद्वारे ७ जानेवारीला मंगळवारी सायंकाळी ४ वाजता रामटेक परिसरात आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खगोलप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी आहे. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सात ग्रह एकाच वेळेला बघता येणार आहे. सूर्यमालेतील सात ग्रह बघण्याचा दुर्मिळ अनुभव मिळणार आहे. या अनोख्या नजराण्यासाठी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाने विशेष तयारी केली असून या आकाश दर्शन कार्यक्रमात तारामंडल आणि दुर्बिणीद्वारे आकाशीय ग्रह-नक्षत्रांचे दर्शन घडवले जाईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी भूषवतील. तसेच कुलसचिव डॉ. देवानंद शुक्लजी, प्राचीन भारतीय विज्ञान आणि मानव्य शास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, वेदांग ज्योतिष विभाग प्रमुख डॉ. दिनकर मराठे आणि वेदांग ज्योतिष विभागाचे प्रो. प्रसाद गोखले जी, सहा. प्राध्यापक डॉ. आशीष जे., डॉ. अंबालिका सेठिया, डॉ. हृषीकेश साहू, अनुज प्रदीप शर्मा, कल्याणी डहाळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

हेही वाचा : भाजप उमेदवाराची न्यायालयात धाव, विधानसभा निवडणुकीत घोळ…

Two patients in Nagpur diagnosed with HMPV
धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bjp defeated candidate Vijay kamalkishor Agrawal
भाजप उमेदवाराची न्यायालयात धाव, विधानसभा निवडणुकीत घोळ…
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
Nagpur fake government jobs
नागपूर : सावधान! शासकीय नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रे; टोळ्या सक्रिय…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
hmpv virus latest news in marathi
नागपूर : एचएमपीव्ही विषाणूचा धोका वाढला! उच्च न्यायालयाला हस्तक्षेप…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

सात चंद्र दर्शनाचा अनोखा सोहळा

नभोमंडपात ग्रह-तारकांचा अनोखा मेळा एकत्र बघता येणार आहे. विशेष म्हणजे आगामी ७ जानेवारीला सुमारे सात घटनांचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सूर्यमालेतील सात खगोल, सात राशी, नक्षत्र समूहातील सातव्या पुनर्वसू नक्षत्राचे, सात तारकांच्या सप्तर्षीचे उदय समयाला, सात बहिणींच्या व सात तारकांच्या कृत्तिका नक्षत्राच्या उपस्थितीत, सात चंद्र दर्शनाचा हा अनोखा सोहळा होणार आहे. सूर्यमालेतील सात ग्रह बघता येतील. यावेळी पृथ्वीवरुन पश्चिमेस शुक्राची तेजस्वी चांदणी २५ अंशावर, जरा वर शनी ग्रह ३५ अंशावर कुंभ राशीत, नंतरचा नेपच्यून ४७ अंशावर आणि आकाश मध्याशी अष्टमीचा अर्धा चंद्र ७५ अंशावर मीन राशीत, नंतर पूर्वेस वर युरेनस ७४ अंशावर मेषेत, त्याचे जवळचा ठळक गुरु ग्रह ५६ अंशावर वृषभ राशीत रोहिणी जवळ आणि पूर्व क्षितिजावर उदित लालसर मंगळ ग्रह कर्क राशीत असेल.

Story img Loader